ताज्या बातम्या

3 जुन काळा दिवस, आम्ही विसरू शकत नाही; गोपीनाथ गडावरुन शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केल्या भावना

Published by : Sudhir Kakde

गोपीनाथ गडावर आज गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांनी उपस्थिती लावली होती. त्या कार्यक्रमात शिवराज सिंह चौहान यांनी गोपीनाथ मुंडेंच्या अवेळी जाण्याने दु:ख झाल्याचं म्हणत आपल्या अश्रृंना वाट मोकळी करुन दिली. मी थकणार नाही, मी थांबणार नाही आणि कुणासमोर कधीही झुकणार नाही असं गोपीनाथजी म्हणायचे असं शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं.

गोपीनाथ गडावरुन पंकजा मुंडे यांनी राज्यातील ओबीसी समाजाला साद घातली असून, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष आकर्षित केलं. शिवराजसिंह चौहान यांनी मध्यप्रदेशमध्ये ओबीसींना आरक्षण दिलं तसं महाराष्ट्र सरकारनेही द्यावं असं आवाहन पंकजा मुंडेंनी केलं आहे. यापूर्वी झालेल्या विधानपरिषद आणि आताच्या राज्यसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा अपेक्षाभंग झाला. परंतुं नुकत्याच होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. याबाबत त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. भाजपचे दिवंगत जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा हा स्मृती समर्पित कार्यक्रम आहे. बहुजनांसाठी गोपीनाथ मुंडे यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. असा कुठलाही महाराष्ट्रातला नेता नाही जो गोपीनाथराव यांच्यासाठी इथे आला नाही. लोकांना नवीन नवीन नेते गडावर यावेत असं वाटतं असतं.

मंधाना-शेफालीचा धमाका! टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक; बांगलादेशचा धुव्वा उडवून T20 मालिका जिंकली

"धेर्यशील माने किंवा इतर उमेदवार महत्त्वाचे नाहीत, कारण...", हातकणंगलेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Daily Horoscope 3 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष ३ मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"ज्यांनी गुन्हा केला नाही, त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम मोदी सरकारनं केलं", सांगलीच्या सभेत शरद पवारांचा हल्लाबोल