Admin
Admin
ताज्या बातम्या

आमदार सदा सरवणकरांच्या अडचणी वाढणार? पिस्तूल जप्त

Published by : Siddhi Naringrekar

शिवसेना-शिंदे गटातील संघर्षानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. दादर पोलिसांनी एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे पिस्तूल जप्त केले आहे.अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवीत सरवणकर समर्थक आणि शिवसैनिक समोरासमोर आले होते. गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. मात्र, या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील आपला मंच उभारला होता. या मंचावरून शिंदे गटाच्या लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अपशब्द वापरले. त्यामुळे दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली. या वादाचे रुपांतर मध्यरात्रीतील राड्यात झाले.

पोलिसांनी मध्यस्थी केल्याने त्यावेळी संघर्ष टळला, मात्र शनिवारी पुन्हा या वादाचे पडसाद उमटले होते. प्रभादेवीत शनिवारी रात्री शिंदे गट आणि शिवसैनिक समोरासमोर आले. त्यावेळी सरवणकर समर्थक आणि शिवसैनिक यांच्यात मारामारी झाली होती. पोलीस ठाण्यात आले असता सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे.

दादर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या आरोपाखाली सदा सरवणकर यांच्याविरोधात रविवारी शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून, जप्त करण्यात आलेलं पिस्तूल फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात येणार आहे.

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण