Historic Decision of the High Court : केवळ आय लव्ह यु असे बोलणे म्हणजे लैंगिक छळ नाही असा ऐतिहासिक निर्णय उच्च न्यायालयाने दिला असून यासंदर्भात आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 23 ऑक्टोबर 2015 मध्ये घडलेल्या घटनेसंदर्भात न्यायालयाकडून हा निर्णय देण्यात आला असून आरोपीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे.
23 ऑक्टोबर 2015 साली नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील खापा गावात एक अल्पवयीन मुलगी घरी जात असताना संबंधित आरोपीने त्या मुलीचा हात पकडून तिला आय लव्ह यु असे म्हणाला. या प्रकरणी त्या पीडित मुलीच्या घरच्यांनी काटोल पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तेथील पोलिसांनी आरोपीविरोधात 354 अ, 354 ड आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8 अंतर्गत गुन्हा दाखल केला. यामध्ये त्या आरोपीला 2017 रोजी सत्र न्यायालयाकडून तीन वर्ष तुरुंगवास आणि 5 हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकारानंतर उच्च न्यायालयाकडे आरोपीने दाद मागत सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले. यादरम्यान आरोपीचा पोलिसांबरोबर, मुलीच्या नातेवाईकांसोबत आणि न्यायालयातही वाद झाला होता त्यामुळे त्याला या प्रकरणात अडकवल्याचे आरोपीच्या वकिलाकडून सांगण्यात आले होते. मात्र जेव्हा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात हे प्रकरण आले तेव्हा न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांनी याप्रकरणी योग्य तपासणी करत निकाल आरोपीच्या बाजूने लावला.
आय लव्ह यु बोलणे ही केवळ प्रेमाची भावना व्यक्त करण्याची कृती आहे. कोणताही लैंगिक हेतू किंवा गैरवर्तन असल्याशिवाय या वाक्याचा वापर करणे लैंगिक छळ ठरत नाही. एखादी व्यक्ती जर आपल्या मनातील भावना केवळ शब्दांवाटे तुम्हाला सांगत असेल तर त्याला लैंगिक छळ म्हणता येणार नाही.या प्रकरणात आरोपीने त्या मुलीचा कोणत्याही प्रकारे विनयभंग केला नव्हता किंवा कोणतेही अश्लील चाळे केले नव्हते . त्यामुळे न्यायालयाने निकाल त्या मुलाच्या बाजूने लावत त्याची यातून निर्दोष मुक्तता केली आहे.
हेही वाचा...