ताज्या बातम्या

Sonu Nigam : सोनू निगमच्या अडचणीत वाढ; पहलगाम हल्ल्यानंतरच्या 'त्या' वक्तव्यावरुन कन्नड समाज आक्रमक

सोनू निगम विवाद: कन्नड समर्थक संघटना आक्रमक; पहलगाम विधानावरून तक्रार दाखल.

Published by : Team Lokshahi

बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम (Sonu Nigam) सध्या वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. सोनू निगम यांच्याविरुद्ध एका कन्नड संघटनेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याच्या एका विधानाबाबत कन्नड समर्थक या संघटनेचे हे म्हणणे आहे की, त्याने कन्नड भाषिक समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. परफॉर्म करत असताना त्याच्या एका चाहत्याने कन्नड भाषेत गाण्याची विनंती केली. त्यावर सोनू निगम म्हणाला की, "कन्नड, कन्नड, कन्नड, म्हणूनच पहलगाममध्ये तो अपघात झाला."

सोनूविरुद्धच्या तक्रारीमध्ये काय म्हटले होते?

बंगळुरुमधील कर्नाटक रक्षण वेदिके (Karnataka Rakshana Vedike) संघटनेच्या अध्यक्षांनी सोनू निगमविरुद्ध तक्रार दाखल केली आहे की, गायकाने कर्नाटकात ही भाषा बोलणाऱ्या लोकांना द्वेषपूर्ण भाषण दिले आहे, ज्यामुळे हिंसाचार भडकू शकतो. तक्रारीत म्हटले आहे की, "सोनू निगमच्या विधानामुळे कन्नड समुदायाचे मोठे नुकसान झाले आहे. कन्नड गाणे गाण्याच्या सध्या सांस्कृतिक विनंतीची तुलना दहशतवादी हल्ल्याशी करुन, निगम यांनी कन्नड यांना असहिष्णु किंवा हिसंक म्हणून विचित्र वक्तव्य केल आहे. जे त्यांच्या शांतताप्रिय आणि समावेशक स्वभावाच्या विरुद्ध आहे".

25-26 एप्रिल रोजी बंगळुरुतील विरोनगर येथील एका महाविद्यालयामध्ये झालेल्या संगीत कार्यक्रमादरम्यान सोनू निगमने वादग्रस्त विधान केले होते. ज्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली. त्यानंतर एका कन्नड संघटनेने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यावेळस सोनू निगम याने 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे घडलेल्या घटनेशी संबंध जोडला होता.

सोनू निगम व्हिडिओमध्ये नेमंका काय म्हणाला?

सोनू निगम म्हणाला की, "मला हे आवडले नाही की मी एका मुलासमोर कन्नड गाणी गातोय. जेवढे त्याचे वय पण नसेल त्याच्या आधीपासून मी कन्नडमध्ये गाणी गातोय. पहलगाममध्ये जे घडले त्याचे हेच कारण आहे ना? तू जे करत आहेस, आत्ता जे केलस त्याचे कारण आहे ना? बघ तुझ्या समोर कोण उभा आहे." सोनू निगम याने कन्नड लोकांवर आणि भाषेवर प्रेम असल्याचे म्हटले असले तरी, त्याने केलेल्या पहलगामच्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ankita Lokhande and Vicky Jain: अंकिता लोखंडेच्या पती विकी जैनला अपघात; हातात काचांचे तुकडे रुतले, तब्बल 45 टाके

Latest Marathi News Update live : छ.संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याची उभारणी

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटीलांची ठाम भूमिका; भारत-पाकिस्तान क्रिकेटवर आक्षेप

Sanjay Raut On Ajit Pawar : अजित पवारांवर संजय राऊतांचा घणाघात; भारत-पाक सामना प्रकरणावरून चांगलीच जुंपली