उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकीच्या चर्चा सध्या झडू लागल्या आहेत. खरंतर मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन भावांच्या एकीच्या हालचाली सुरू झाल्यात म्हणूनच, या दोघांचीही महापालिकांमधली ताकद किती आणि त्याचा इतिहास काय?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याबाबत सध्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. राज ठाकरेंच्या वक्तव्याने या चर्चा सुरू झाल्या आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे या चर्चांना आणखी बळ मिळालं. खरंतर आता मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. म्हणूनच हे दोघे भाऊ एकत्र येतायत का? अशीही चर्चा रंगलीय. या पार्श्वभूमीवर महापालिकांच्या पातळीवर दोन्ही पक्षांचा इतिहास आणि ताकद किती आहे ते एकदा पाहा...
9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेची स्थापना
2007 साली मुंबईत मनपाच्या निवडणुकीत मनसेचे 7 नगरसेवक
2007 साली पुणे महापालिकेत मनसेचे 8 नगरसेवक निवडून आले
2007 साली नाशिक मनपात मनसेचे 12 नगरसेवक निवडून आले
2007 साली ठाणे महापालिकेच मनसेचे 3 नगरसेवक निवडून आले
2012 साली नाशिक मनपात मनसेचे 40 नगरसेवक निवडून आले
2012 साली मनसे-राष्ट्रवादी युती होऊन नाशिक मनपात सत्ता
2017 साली मुंबई महापालिकेत मनसेचे 7 नगरसेवक विजयी
2017 साली नाशिक मनपात मनसेचे 5 नगरसेवक विजयी
2017 साली मनसेचे पुण्यात 3, पिंपरी-चिंडवडला 1 नगरसेवक
मुंबई महापालिकेतील मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेत गेले
मनसेचे माजी नगरसेवक संजय तुर्डे सोमवारी शिंदेंसोबत जाणार
उद्धव ठाकरे आणि मनपातली कामगिरी
2017 साली मुंबई मनपात शिवसेनेचे 84 नगरसेवक
4 अपक्ष नगरसेवक शिवसेनेत, संख्याबळ 88
मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेत, संख्याबळ 94
पक्षफुटीनंतर ठाकरेंचे अनेक नगरसेवक शिंदेंसोबत
फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत 55 नगरसेवक
तर अशी या दोघा भावांची महापालिकांमधली कामगिरी आहे. आता मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यातच हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर, महापालिकांत हे दोघे किती मजल मारतायत? हे पाहणं महत्त्वाचं असेल.