Diva railway | Konkan | Raju Patal Team lokshahi
ताज्या बातम्या

दिवा रेल्वे स्थानकातून कोकणला जाण्यासाठी विशेष गाडय़ा, राजू पाटलांकडून रेल्वेचे मनसे आभार

राजू पाटलांकडून रेल्वेचे मनसे आभार

Published by : Shubham Tate

कल्याण (अमजद खान) - दिव्यात राहणाऱ्या नागरिकांना गणपती उत्सवाकरता कोकणात जाण्याकरसाठी दिवा रेल्वे स्थानकातून विशेष गाडय़ा सोडण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली होती. त्यांच्या या मागणीला रेल्वे प्रशासनाने सकात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांच्या वतीने धन्यवाद मानले आहेत. (Special trains from Diva railway station to Konkan, Raju Patal's demand was successful)

गणपती उत्सवासाठी गाडी क्रमांक ६१०११ दिवा रोहा चिपळूणपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही गाडी दिवा उपनगर सकाळी ९:१०

रोहा आगमन ११:००,

रोहा ११:०५, चिपळूण १३:२०

परतीच्या प्रवासात चिपळूण १३:२५ रोहा आगमन १६:१० वाजता आणि दिवा आगमन १८:४५ वाजता हाेणार आहे.

२५ ऑगस्ट रोजी गणपती विशेष गाडी क्रमांक ०११७१ ला दिवा येथे थांबा देण्यात आला आहे. तसेच आम्ही केलेल्या मागणीनुसार, या ट्रेनमध्ये ४ GS डबे दिव्यासाठी लॉक केले जातील.

सावंतवाडीसाठी दिवा ते सावंतवाडी अशी रोजची सेवा चालवली जात आहे.

ट्रेन क्र. १०१०५ दिवा सकाळी ६:२५ ची सावंतवाडीला १८:३०

परतीचा प्रवास सावंतवाडी २०:१० वाजता आणि दिवा आगमन ०८:२५ वा अशी माहिती प्रशासनाकडून मनसे आमदार पाटील यांना कळविण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा