ताज्या बातम्या

अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात उसळला, सेन्सेक्स १२०० अंकांनी वधारला

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यानंतर शेअर बाजारात तेजी निर्माण झाली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यानंतर शेअर बाजारात तेजी निर्माण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकमध्ये 1200 अंकानी वाढ झाली. तर, निफ्टीतही 300 अंकानी वधारला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 ची घोषणा होताच शेअर बाजारात तेजी आली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक विक्रमी 12000 अंकांवर वाढून 60,583.04 वर पोहोचला. त्याच वेळी, निफ्टी 300 अंकांच्या जबरदस्त वाढीसह 17,934.70 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, मिशन मोडवर पर्यटनाला चालना दिली जाईल. यानंतर हॉटेलचा स्टॉक 8 टक्केपर्यंत वाढला. तर, दुसरीकडे, तंबाखूवरील कर वाढीनंतर आयटीसी, गॉडफ्रे फिलिप्सचे समभाग 4 टक्क्यांहून अधिक घसरले. निर्मला सीतारामन यांनी ऊर्जा सुरक्षा क्षेत्रात 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. त्यानंतर ग्रीन एनर्जी शेअर्स 7 टक्क्यांपर्यंत वाढले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ajit Pawar Solapur : सोलापुरात शेत नुकसान पाहणीदरम्यान अजित पवारांसमोर अचानक मर्डर केसची गुगली

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर

Nanded Flood : नांदेड जिल्हा पूर परिस्थतीच्या उंबरठ्यावर! विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले

Girish Mahajan : मी पैसे घेऊन...महाजन यांच्या वक्तव्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त