Nagapur : मेडिकल वॉर्डमध्ये भटक्या श्वानांचे वाढते प्रमाण; प्रशासनाचे दुर्लक्ष,  Nagapur : मेडिकल वॉर्डमध्ये भटक्या श्वानांचे वाढते प्रमाण; प्रशासनाचे दुर्लक्ष,
ताज्या बातम्या

Nagapur : मेडिकल वॉर्डमध्ये भटक्या श्वानांची दहशत; प्रशासनाचे दुर्लक्ष

नागपूर: मेडिकल वॉर्डमध्ये भटक्या श्वानांची दहशत, प्रशासनाचे दुर्लक्ष.

Published by : Team Lokshahi

नागपूरमध्ये मेडिकल वॉर्ड परिसरात भटक्या श्वानांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. दररोज रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची सतत ये -जा चालू असताना तिथे मोठ्या प्रमाणावर श्वान बसलेले असल्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे. याबाबत प्रशासनाला तक्रार करण्यात आली होती मात्र अद्याप त्यावर कोणतीही कारवाई केली गेलेली नाही.

नागपुरातील मेडिकल वॉर्ड नंबर 30, 50 आणि 51 च्या रुग्णालय परिसरात भटक्या श्वानांनी अक्षरशः दहशत माजवली आहे. नागपूर मेडिकल परिसरात भटके कुत्रे मोठ्या प्रमाणात वावरताना दिसत आहेत. तेथील भटक्या श्वानांमुळे रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचारी त्या परिसरात वावरताना प्रचंड भीतीखाली आहेत. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयात ये-जा करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.याबाबत 10 जून रोजी प्रशासनाकडे तक्रारही करण्यात आली होती. मात्र अद्याप या मेडिकलच्या आवारातील बेवारस श्वानांना उचलण्यासाठी कोणतीही हालचाल प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. याउलट श्वानांनी चावल्यामुळे रुग्णालयात लस घेणाऱ्यांच्या संख्येत मात्र वाढ होताना दिसत आहे.

2006 साली मातेच्या कुशीतून मुलाला घेऊन जाऊन त्या बाळाला कुरतडले होते त्यात त्या बाळाचा मृत्यू झाला होता. तसेच काही दिवसांपूर्वी, भटक्या कुत्र्यांनी डॉक्टरांवरही हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. याकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्यामुळे जनतेच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करत नसल्याने मेडिकल वॉर्ड परिसरातील नागरिक संतापले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shrimant Yuvraj Sambhajiraje Bhosale : 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे'च्या प्रदेशाध्यक्षपदी श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले यांची निवड

Chhatrapati Sambhajinagar : 35 वर्षांनंतर धक्का! PSI गफ्फार खान यांचे जात प्रमाणपत्र रद्द; पुढील वर्षी निवृत्तीपूर्वीच मोठा निर्णय

Latest Marathi News Update live : बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुखचं नागपूरात स्वागत

Sanjay Raut In Rajya Sabha : 'पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा'; पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांचा मोदींवर जोरदार हल्ला