Sudhir Mungantiwar Team Lokshahi
ताज्या बातम्या

"अशा गुंडांवर ताबडतोब कारवाई करावी" सुधीर मुनगंटीवार यांचा कर्नाटक सरकारला इशारा

राज्यात सध्यस्थितीत अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून कर्नाटक सरकारकडून चिथावणीखोर वक्तव्यासोबत कृत्य देखील होत आहे.

Published by : shweta walge

राज्यात सध्यस्थितीत अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून कर्नाटक सरकारकडून चिथावणीखोर वक्तव्यासोबत कृत्य देखील होत आहे. मात्र महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सीमावाद उफाळून आला आहे. कर्नाटकात महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ले झालेत तर महाराष्ट्रातील संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. त्यावरच आता राजकरण तापलेले असताना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी कर्नाटक सरकारला थेट इशारा दिला आहे.

काय म्हणाले सुधीर मुनंगटीवार, जर कोणी गुंडाने महाराष्ट्राशी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हे कर्नाटकने लक्षात ठेवावे आणि आणि अशा लोकांना आम्ही नक्कीच धडा शिकवू शकतो, असा थेट इशारा मुनगंटीवार यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात हल्ला करण्यात आल्यानंतर कर्नाटक सरकारने अशा गुंडांवर ताबडतोब कारवाई करावी आणि जे जाळपोळ करतात त्यांना तुरुंगात टाकावे, असं देखील मुनगंटीवार म्हणाले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेचे प्रश्न तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जन्माला घातले, प्रांत निर्मितीसाठी आयोग स्थापन झाला तेव्हा पंडित नेहरूंनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या आवाजाचा आदर केला नाही आणि त्याचे परिणाम आज महाराष्ट्रातील जनता, मराठी जनता भोगत आहे, अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Water Supply : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! 'या' भागातील पाणीपुरवठा आज राहणार बंद

Latest Marathi News Update live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मिरा रोडच्या दौऱ्यावर

Earthquake in Alaska : अमेरिकेत भूकंपाचे तीव्र धक्के; आता त्सुनामीचाही दिला इशारा

Rajasthan School Girl: 9 वर्षांच्या मुलीला एका तासात दोन वेळा हृदयविकाराचा झटका