ताज्या बातम्या

Udaipur File Film Controversy : 'उदयपूर फाईल्स'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयानं बंदी घालण्याच्या मागणीची याचिका फेटाळली

राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैयालाल साहू मर्डर केस या सत्यघटनेवर आधारीत 'उदयपूर फाईल्स' हा हिंदी चित्रपट उद्या 11 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

Published by : Rashmi Mane

राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैयालाल साहू मर्डर केस या सत्यघटनेवर आधारीत 'उदयपूर फाईल्स' हा हिंदी चित्रपट उद्या 11 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. अमित जानी यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अभिनेते विजय राज यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली असून ही याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

'उदयपूर फाइल्स' या आगामी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. उदयपूरमध्ये घडलेल्या कन्हैयालाल हत्याकांडावर आधारित असलेल्या या चित्रपटाविरोधात आरोपी मोहम्मद जावेद याने याचिका दाखल केली होती. त्यात म्हटले होते की, प्रकरणाची सुनावणी अजून न्यायप्रविष्ट असताना चित्रपट प्रदर्शित झाल्यास निष्पक्ष न्यायावर परिणाम होऊ शकतो. मात्र, युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने "तुम्ही हे प्रकरण संबंधित कनिष्ठ न्यायालयात मांडावे", असा सल्ला दिला. तसेच तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, "चित्रपट प्रदर्शित होऊ द्या."

आता या निर्णयामुळे 'उदयपूर फाइल्स' हा चित्रपट उद्या मुंबईसह देशातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. कन्हैयालाल हत्याकांडासारख्या संवेदनशील विषयावर आधारित या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा