Supriya Sule
Supriya Sule  Team Lokshahi
ताज्या बातम्या

Supriya Sule : एसटी कर्मचारी आत्महत्येस सुप्रिया सुळेंनी सरकारला धरलं जबाबदार

Published by : shweta walge

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पगार न झाल्याने चालकाने हे पाऊल उचलले असल्याची चर्चा सुरू असली तरी अद्याप आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सूर्यवंशी यांची आत्महत्या ही दुर्देवी घटना असल्याचे ट्विट करत या घटनेला राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील रहिवासी भीमराव सूर्यवंशी यांनी आज पहाटे त्यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. या घटनेची माहिती कळताच कवठेमहंकाळ पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी सूर्यवंशी यांचा मृतदेह कवठेमहांकाळ शासकीय रुग्णालयात दाखल केला.

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेनंतर ट्विट करुन महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे भांडवल करुन सत्तेत बसलेल्या ईडी (ED) सरकार या कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार करण्यात देखील अपयशी ठरल्याचे सुळेंनी म्हटलं आहे.

या गरीब, कष्टाळू आणि संवेदनशील कर्मचाऱ्यांच्या भावनांचा या सरकारने अक्षरशः खेळ मांडला आहे. हे अतिशय संतापजनक आहे. ईडी सरकारने एस.टी. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर आणि नियमित करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी देखील खासदार सुळेंनी ट्विट करत केली आहे.

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण