पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून यावरुन आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता आरोपी दत्ता गाडेला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पुण्याच्या शिरुरमधील गुनाट गावातून अटक करण्यात आली असून आरोपी सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आहे. मेडिकल तपासणीनंतर आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याला घटनेच्या 70 तासानंतर अखेर अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.
आरोपीच्या अटकेचा घटनाक्रम नेमका कसा ?
आरोपी दत्तात्रय गाडे गुनाट गावातील उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
ड्रोनच्या माध्यमातून दत्तात्रय गाडेचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही.
त्यानंतर दत्ता गाडे रात्री नातेवाईकांच्या घरी साडे दहा वाजता आला
त्यानंतर तो आल्याची माहीती नातेवाईकांनी पोलिसांना दिली
नातेवाईकांकडून त्याने पाण्याची बाटली घेतली आणि माझी मोठी चुक झालीय, मला सरेंडर करायचं असे सांगितल्याची माहिती मिळत आहे.
त्यानंतर पोलीसांनी या घराच्या परीसरात दत्ता गाडेचा शोध सुरु केला. डॅाग स्कॅाड ही त्याठिकाणी आणले.
पोलीसांना त्याचा बदलेला शर्ट सापडला , त्याचा वास डॅाग स्कॅाडला दिला
त्याआधारे डॅाग स्कॅाडने पुढील रस्ता पोलिसांना दाखवला
गाडे नातेवाईकांच्या घराच्या परीसरात असलेल्या कॅनॅालमध्ये लपला होता.
याच ठीकाणी तो ग्रामस्थांना आढळला. ग्रामस्थांनी तो दत्ता गाडेच असल्याचं स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी दत्ता गाडेला तात्काळ ताब्यात घेतलं.