Monika Bhadoriya : 'तारक मेहता...'मधील अभिनेत्रीनं निर्मात्याच्या 'त्या' आक्षेपार्ह विधानामुळं केला जीवन संपवण्याचा विचार; घडलं असं की.... Monika Bhadoriya : 'तारक मेहता...'मधील अभिनेत्रीनं निर्मात्याच्या 'त्या' आक्षेपार्ह विधानामुळं केला जीवन संपवण्याचा विचार; घडलं असं की....
ताज्या बातम्या

Monika Bhadoriya : 'तारक मेहता...'मधील अभिनेत्रीनं निर्मात्याच्या 'त्या' आक्षेपार्ह विधानामुळं केला जीवन संपवण्याचा विचार; घडलं असं की....

मोनिका भदौरियाचे गंभीर आरोप: 'तारक मेहता' निर्मात्यांच्या वर्तनामुळे मानसिक त्रास, आत्महत्येचा विचार.

Published by : Riddhi Vanne

Taarak Mehta fame Monica Bhadauria makes serious allegations of mental harassment due to Asit Modi's behavior : तारक मेहता मधील बावरीचे पात्र साकारणारी मोनिका भदौरियाने शोचे निर्माते आसित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी केलेल्या अत्याचारामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले होते. ती रागाच्या भरात आत्महत्या करण्यास निघाली होती असा धक्कादायक खुलासा तिने माध्यमांशी बोलताना केला.

तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका गेली 17 वर्षे अविरतपणे लोकांच्या मनोरंजनाचे काम करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना काहीकाळ हसवत ठेऊन आनंदी करण्याचे काम या मालिकेतील कलाकार अगदी निष्ठेने करत आहेत. दरम्यान या 17 वर्षांच्या काळात या मालिकेचे हजारो भाग झाले. त्यात नवनवीन पात्रे नव्याने येत गेली तर काही पात्रांची या कार्यक्रमामधून एग्झिटही झाली. त्यातीलच एक म्हणजे बावरी म्हणजे मालिकेत बाघा याच्या गर्लफ्रेंडची भूमिका बजावणारी अभिनेत्री मोनिका भदौरिया हिने सुद्धा अलीकडेच या मालिकेतून काढता पाय घेतला. याबाबत तिला विचारले असता भयानक वास्तव समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, तिच्यावर निर्माते आसित मोदी यांच्याकडून अनेकवेळा त्रास दिला गेला. तसेच तिचे कामाचे 4 ते 5 लाख रुपये तिला देण्यास निर्माते टाळाटाळ करत होते. बऱ्याच वेळा शूटिंगच्या वेळी आसित मोदी तिच्यावर या ना त्या कारणावरून तिला सगळ्यांसमोर ओरडत असे. तिला शिवीगाळ ही करण्यात आली. या शोच्या दरम्यान तिच्या आईचे आणि आजीचे निधन झाल्यामुळे ती आधीच मानसिकदृष्टया खचली होती. त्यात मालिकेचे निर्माते आणि प्रोजेक्ट हेड तिला तिच्या वजनावरून बोलायचे. ‘तुला मुंबईत काम मिळणार नाही, अशी धमकीही तिला निर्मात्यांकडून देण्यात आली. ‘जरा स्वतःला बघ असं वाटतं प्रेग्नेंट आहेस आणि तुझं लग्न देखील झालं नाहीये…अश्या शब्दात तिला बोलायचे . याच गोष्टींच्या अतिताणाने तिने मोठे पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यानंतर तिने स्वतःला सावरले.

मोनिका भदौरियाने या मालिकेच्या निर्मात्यांच्या आणि प्रोजेक्ट हेडच्या जाचाला न कंटाळता बिनधास्तपणे शो सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान केवळ अभिनेत्री मोनिका भदौरियाच नाही त्या मालिकेतील अनेकांनी निर्माते आसित मोदी यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत .त्यामुळे येणाऱ्या काळात या मालिकेमध्ये निर्मात्यांमुळे अजून किती कलाकारांची एग्झिट होणार आहे हे येणारा काळच ठरवेल.

हेही वाचा...

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ajit Pawar : 'युती होईल किंवा नाही याचा विचार...'; पुण्यातील बैठकीत अजित पवार यांचा इशारा

Manoj Jarange Maratha Protest : मनोज जरांगेंकडून उद्याच्या आंदोलनासाठी अर्ज, पोलिसांकडून परवानगी मिळणार?

Sharad Pawar On Maratha Reservation : "...तर ओबीसींवर अन्याय होईल" मराठा आरक्षणावर बोलताना शरद पवारांनी व्यक्त केली ती भीती

Virar Building Collapsed Case : विरार इमारत दुर्घटनेत 5 जणांना अटक; वसई न्यायालयाने सुनावली कोठडी