आता Google Maps तुम्हाला टोल वाचवण्यासाठी करणार मदत, कसं जाणून घ्या आता Google Maps तुम्हाला टोल वाचवण्यासाठी करणार मदत, कसं जाणून घ्या
ताज्या बातम्या

आता Google Maps तुम्हाला टोल वाचवण्यासाठी करणार मदत, कसं जाणून घ्या

गुगल मॅप्सच्या नव्या फिचरने टोल वाचवा, ट्रॅफिकमुक्त प्रवास करा.

Published by : Team Lokshahi

आता तुम्ही तुमच्या मोबाईलमधील गूगल मॅपचा Google Map वापर करून तुमचा टोल Tool वाचवू शकता. यामुळे तुमच्या पैशांची बचत होणार असून तुम्हाला यामुळे ट्रॅफिकविरहित Traffic free रस्त्यातून वाहतूक करता येणे शक्य होणार आहे. गुगल मॅपने Google Map एक नवा फिचर New feature आपल्या मॅपमध्ये ऍड केला असून हा प्रवाशांसाठी वरदान ठरणार आहे.

दररोज लाखो प्रवासी रस्तेवाहतूक करत असतात. त्यातील बरेच प्रवासी एक्स्प्रेस Express किंवा महामार्गावरून जात असताना त्यांना प्रत्येकवेळी टोल Toll हा भरावाच लागतो. मात्र यावर उपाय म्हणून गूगल मॅप च्या नव्या व्हर्जनमध्ये महत्वाचा फिचर ऍड Feature add करण्यात आला आहे. गुगलमॅपचे आधुनिक व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये घेतल्यानंतर "अव्हॉइड टोल्स" "Avoid Tolls" या पर्यायाद्वारे तुम्हाला तुमचा टोल वाचवता येणार आहे. या अव्हॉइड टोल्स च्या पर्यायावर क्लिक केल्यावर ज्या रस्त्यांवर टोल घेतला जात नाही त्या रस्त्यांचा पर्याय तुम्हाला गूगल मॅप दाखवेल. याद्वारे त्या रस्त्यावर प्रवास करून टोल न भरता तुम्ही इच्छित स्थळी पोहोचू शकणार आहात. याचबरोबर आणखी एक महत्वाचा फिचर यात समाविष्ट करण्यात आला आहे तो म्हणजे ज्या ठिकाणी वाहनांची गर्दी नसेल अश्या ठिकाणांची माहितीही हा गुगलमॅप तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्हाला ट्रॅफिकजॅमचा सामना न करता आरामात प्रवास करता येणे शक्य होणार आहे. मात्र यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये गुगलमॅप चे आधुनिक व्हर्जन असणे गरजेचे आहे.

हेही वाचा...

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Foot Care During Rainy Season : पावसाळ्यात अशी घ्या पायांची काळजी ; बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी उपाय आणि सावधगिरी

Donald Trump On Pakistan : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा ; एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल...

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Latest Marathi News Update live : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता