ताज्या बातम्या

Barshi-Dharashiv: बार्शी-धाराशीव मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात

Barshi-Dharashiv Bus Accident: सोलापूरच्या बार्शीतून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. बार्शीवरून धाराशिवकडे जाणाऱ्या एसटी बसच्या भीषण अपघात झाला आहे.

Published by : Team Lokshahi

Dharashiv ST Bus Accident: सोलापूरच्या बार्शीतून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. बार्शीवरून धाराशिवकडे जाणाऱ्या एसटी बसच्या भीषण अपघात झाला आहे. बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर एसटी बस रस्त्याच्या कडेला कलंडली. बार्शी-धाराशिव महामार्गांवर हा अपघात झाला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला.

यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तीन तरुण गाडी खाली चिरडून ठार झाले. कार्तिक यादव, ओंकार पवार, ओम आतकरे अशी तीन तरुणांची नावं आहेत. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील तिनही तरुण एसटी बस खाली अडकले. एका तरुणाचं शीर हे शरीरापासून वेगळं झालं. तर इतर दोघे जवळपास 50 फूटांपर्यंत फरफटत गेले. त्यांनी बसमधील काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.

बार्शी - धाराशीव महामार्गावरील तांदुळवाडी जवळील सुयेश विद्यालया नजीक हा विचित्र अपघात झाला आहे. बार्शीहुन धाराशीवकडे जाणाऱ्या एसटी बसला अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तांदुळवाडीतील ग्रामस्थ मदतीला धावून आले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे असलेल्या केबिनमध्ये उद्धव ठाकरे दाखल

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश