बहुचर्चित असलेली एलॉन मस्क यांची प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी मुंबईमध्ये आपले पहिले टेस्ला शोरूम सुरू करत आहे. आता मुंबईकरांनासुद्धा या कारची झलक पाहता येणार आहे. भारतातील टेस्लाच्या या एन्ट्रीमुळे कारप्रेमींच्या आनंदात भर पडणार आहे.
टेस्लाचे पहिले शोरूम मुंबईतील मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उघडले जाणार असून त्यासाठी कंपनीने 4000 चौरस फूट जागा भाडेतत्वावर घेतली आहे. त्यासाठी कंपनी दरमहा 35 लाख रुपयांपेक्षा जास्त भाडे देणार आहे. 15 जुलै रोजी या शोरुमचे उद्घाटन करण्यात येणार आहे. एलॉन मस्क हे भारतात टेस्ला ही आलिशान गाडी भारतीयांसाठी लाँच करणार की सर्वसामान्यांना परवडणारी नवीन कार बाजारात आणणार याबाबत अजून स्पष्टता झालेली नाही.
गेल्या महिन्यात एलॉन मस्क आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांना टेस्ला आपल्या भारतात येईल, अशी आशा होती. त्याप्रमाणे आता टेस्लाची झलक मुंबईकरांना पाहता येणार आहे. मुंबईमधील बीकेसीमध्ये शोरूम उघडल्यानंतर या कंपनीने भारतात नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून नवीन रोजगार उपलब्ध करून दिला आहे. टेस्ला सध्या भारतात उत्पादन युनिट उभारणार नाही. जर्मनीतील बर्लिन-ब्रँडनबर्ग येथील गिगा फॅक्टरीमधील उत्पादित कार भारतात सध्या आणल्या जाणार आहेत.
एलॉन मस्क स्वतः 2022 पासून भारतात या टेस्ला लाँच करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र भारतात इलेक्ट्रिक वाहनांवर जे आयात कर लादले होते. त्यामुळे टेस्लाला भारतात येण्यास विलंब झाला होता. मात्र अखेर 2025 मध्ये या कारची भारतात एंट्री झाली आहे. मुंबईमधील हे शोरूम ग्राहकांसाठी एक्सपीरियन्स सेंटरसारखे काम करणार असून ग्राहकांना टेस्लाच्या गाड्या अगदी जवळून पाहता येणार आहेत. त्यांना या गाड्यांची टेस्ट ड्राईव्हसुद्धा घेता येणार आहे. मॉडल 3, मॉडल Y, मॉडल S, मॉडल X आणि भविष्यातील सायबरट्रकची माहिती त्यांना येथे मिळणार असून टेस्लाचे सोलर पॅनल, पावरवॉल, सोलर रुफ अशी सौरऊर्जा उत्पादनेही ग्राहकांना अनुभवता येणार आहेत.
हेही वाचा