Thane Fire  
ताज्या बातम्या

Thane Fire : आग चक्क 10 तासांनी आटोक्यात

ठाणे जिल्ह्यातील सिने वंडर मॉलजवळ असलेल्या ओरियन बिझनेस पार्क इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली.

Published by : Pankaj Prabhakar Rane

ठाणे : शुभम कोळी | ठाणे जिल्ह्यातील सिने वंडर मॉलजवळ (Cine Wonder Mall) असलेल्या ओरियन बिझनेस पार्क (Orion Business Park) इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. तब्बल 10 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंआहे. दरम्यान, या आगीत इमारतीच्या आत पार्क केलेली 15 ते 20 वाहनेही जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, या आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले होते. इमारतीमध्ये असलेल्या सर्व लोकांना वेळीच सुखरुप बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. ओरियन बिझनेस पार्क ही घोडबंदर रोड, ठाण्यातील पाच मजली व्यावसायिक इमारत आहे. अचानक ही आग लागल्यानं परिसरातील नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. 

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा