ताज्या बातम्या

सिंधुदुर्गचा लोकसभा उमेदवार भाजपचाच असेल!

लोकसभा प्रवास योजनेमध्ये महाराष्ट्रातील अठरा लोकसभा मतदारसंघांची निवड झाली आहे. त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे

Published by : shweta walge

प्रसाद पाताडे | सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग या भागातील लोकसभा उमेदवार हे भाजप पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड ठरवत असते. राज्यात बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युतीचे सरकार आहे. या मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल व कमळ चिन्हाचाच उमेदवार असेल अशी माहिती पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना लोकसभा प्रवास योजनेचे प्रभाग समन्वयक संजय ऊर्फ बाळासाहेब भेगडे यांनी सिंधूनगरी येथील पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभा प्रवास योजनेमध्ये महाराष्ट्रातील अठरा लोकसभा मतदारसंघांची निवड झाली आहे. त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. याच पाश्र्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामाला बळकटी देणे व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी बाळासाहेब भेगडे यांचा सिंधुदुर्ग रत्नागिरी दौरा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर सिंधूनगरी येथे प्रमुख भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक माध्यमिक पतपेढी सभागृहात गुरूवारी संपन्न झाली. तत्पूर्वी त्याने मुख्यालय पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी या समन्वय समितीचे साहाय्यक माजी आमदार प्रमोद जठार भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली भाजप नेते अतुल काळसेकर भाजप सरचिटणीस प्रभाकर सावंत संजू परब महेश सारंग धनंजय पात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाने राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून सेवा दिली आहे. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबविण्यात येतात या योजनांचा आढावा घेणे नागरिकांशी संवाद साधणे व भारतीय जनता पक्षाची संघटना मजबूत करणे या उद्देशाने लोकसभा प्रवास योजनेत देशभरातील १६० लोकसभा मतदारसंघांची निवड झाली आहे यात महाराष्ट्रातील १८ लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवरच आपला हा जिल्हा दौरा असून भाजप कार्यकर्ते जनता यांच्याशी संवाद साधणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

केंद्रीय मंत्री तसेच राज्य सरकार व केंद्र सरकार याच्या माध्यमातून प्रत्येक भागात विविध विकासकामे व योजना राबविल्या जातात. सर्वसामान्य नागरिकांना याचा योग्य पध्दतीने लाभ मिळण्यासाठी संघटनात्मक पातळीवरही प्रयत्न होत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजप नेते व केंद्रीय मंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा प्रवास योजनेची ही यात्रा सुरू असून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी चांगल्यात चांगले काम करण्याचा प्रयत्न आहे असेही यावेळी बाळासाहेब भेगडे यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस