ताज्या बातम्या

चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने ठेकेदाराने केली कामाला सुरुवात

Published by : Vikrant Shinde

चिपळूणकरांच्या जिव्हाळ्याच्या राज्य परिवहन महामंडळाच्या रखडलेल्या 'हायटेक' बसस्थानकाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने गुरुवारपासून कामाला सुरुवात झाली आहे. या कामासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गुहागर विधानसभा तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या लढ्याला यश आले आहे.चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यानंतर पोटठेकेदाराने कामाला सुरुवात केली. मात्र, नंतर या बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम रखडले ते अजूनही रखडलेले आहेच.

दरम्यान, ठाकरे गटाचे गुहागर विधानसभा मतदारसंघ तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी या बस स्थानकाच्या कामाला वेग मिळावा, यासाठी आवाज उठवला. यामध्ये बस स्थानकाच्या कामासाठी श्राद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यावेळी प्रशासनाकडून योग्य ते आश्वासन दिले होते. तरीही या कामाला वेग मिळाला नाही. परंतु काही दिवसांपूर्वीच संदीप सावंत यांनी या स्थानकाच्या कामाला सुरुवात न झाल्यास बस स्थानकाच्या आवारात गुरे ढोरे बांधून आंदोलन करू असा इशारा दिला होता.दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कार्यकारी अभियंता मुंबई प्रदेश या कार्यालयाने १९ जुलै २०२२ रोजी निविदा प्रक्रिया पूर्ण करून सातारा येथील ठेकेदाराने ३ कोटी ४२ लाख ९१ हजार ५२ हजार रुपयांत या बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम घेतले.

मात्र ठेका घेऊन चार महिन्यांचा कालावधी लोटूनही या ठेकेदाराने अद्याप या कामाला सुरुवात झाली नाही. ही बाब लक्षात येताच संदीप सावंत यांनी काही दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत पंधरा दिवसात या ठेकेदाराने काम न केल्यास या ठेकेदाराचा ठेका रद्द करावा व नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणी करावी लागेल, असा इशारा दिला होता.आता या ठेकेदाराने चिपळूण हायटेक मध्यवर्ती बस स्थानकाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने कामाला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात या बस स्थानकाच्या आवारात गवत व अस्वच्छता निर्माण झाली होती. ती गुरुवारी ठेकेदारांच्या कामगारांनी हा परिसर स्वच्छ केला आहे. आता पुढचे काम वेगात सुरू होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. चिपळूण बस स्थानकावर पाहणी करताना तालुकाप्रमुख संदीपजी सांवत, विभाग प्रमुख बळीराम गुजर,युवासेना शहर प्रमुख पार्थ जागुष्ठे,विभाग प्रमुख साहील शिर्के,शाखाप्रमुख हेमंत मोरे युवासैनिक चिराग सावंत

"त्या पदावरून शरद पवार बाजूला गेले आणि..." बारामतीच्या सभेत अजित पवारांनी सांगितला मोठा किस्सा

Sahil Khan Arrested : छत्तीसगड येथून अभिनेता साहिल खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं

International Dance Day 2024: आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस कधीपासून साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

"नुसतं उभं राहण्यात मजा नाही, पाडण्यात सुद्धा मोठा विजय आहे"; पत्रकार परिषदेत मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं

"बारामतीत अजित पवारांकडून धमक्या दिल्या जात आहेत", संजय राऊतांचा अजित पवारांवर गंभीर आरोप