ताज्या बातम्या

ड्रायव्हर मोबाईल बघत राहिला आणि ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढली; Video व्हायरल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील मथुरा येथे रेल्वे स्थानकावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले होते. ट्रेन चालकाने ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबला, त्यामुळे ट्रेन रुळावरून थेट प्लॅटफॉर्मवर चढली होती. यादरम्यानचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर येत असून सोशल मीडियावर तो व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे मंगळवारी रेल्वेचा भीषण अपघात झाला. चालकाच्या चुकीमुळे ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढली. या रेल्वे दुर्घटनेच्या संयुक्त तपास अहवालात चालक रेल्वे चालवताना मोबाईल फोनवर काहीतरी पाहत असल्याचे समोर आले आहे. तसेच, तो सौम्य नशेच्या अवस्थेत होता, असेही तपास अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही चूक 'क्रू व्हॉईस अँड व्हिडीओ रेकॉर्डिंग सिस्टिम'च्या माध्यमातून उघड झाली.

रेल्वे स्थानकावर आल्यानंतर सर्व प्रवासी खाली उतरले, यानंतर रेल्वे कर्मचारी सचिन त्याच्या मोबाईलवर काहीतरी पाहत असताना ट्रेनच्या इंजिनमध्ये पोहोचला. त्याने आपली बॅग इंजिनच्या एक्सलेटरवर ठेवली आणि त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहू लागला. बॅगेच्या दाबामुळे एक्सलेटर पुढे सरकले आणि ट्रेन पुढे जाऊ लागली आणि हा अपघात झाला. यावेळी प्लॅटफॉर्मवर प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

"मुंबई-ठाण्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये वाघाची डरकाळी फुटली"; पदाधिकारी मेळाव्यात CM शिंदेंचं मोठं विधान

Skin Care: उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या...

Mother's Day 2024: मातृदिनाला आईसोबत नक्की भेट द्या 'या' धार्मिक स्थळांना

Daily Horoscope 11 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या संपत्तीत होईल भरभराट; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 11 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना