थोडक्यात
नाशिकमध्ये विसर्जन मिरवणूकीला सुरुवात
मंत्री गिरीश महाजांच्या उपस्थित विसर्जन मिरवणुकीला श्रीगणेशा
पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात गणरायाला दिला जातोय अखेरचा निरोप
गेली दहा दिवस गणेशभक्तांनी मनोभावे पूजलेल्या गणेश मूर्तींना आज विसर्जित करण्यात येणार आहेत. आपल्या लाडक्या बाप्पांचे भावपूर्ण निरोप देताना गणेशभक्तांचा उत्साह आणि जल्लोष असतोच पण त्या सोबत "पुढच्या वर्षी लवकर या…" अशी प्रेमळ साद ही असते. आज अनंत चतुर्दशी असून सार्वजनिक गणपतीच्या विसर्जनासाठी प्रशासनानेही तयारी पुर्ण केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जन साजरे होत आहे आणि अकोला शहरातही गणेश विसर्जन सुरू झाले आहे.
याचपार्श्वभूमिवर नाशिकमध्ये विसर्जन मिरवणूकीला सुरुवात. नाशिक मनपाच्या पहिल्या मानाच्या श्रीगणेशाची आरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मंत्री गिरीश महाजांच्या उपस्थित विसर्जन मिरवणुकीचा श्रीगणेशा झाला असून, पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात गणरायाला निरोप दिला जात आहे. विसर्जन मिरवणुकीला शहरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची उपस्थिती देखील पाहायला मिळाली आहे. विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वाजवण्याचा आनंद घेतला.
यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, "आज गणरायाला निरोप देणार आहोत. जल्लोषात सज्ज झालो आहे. पाऊस खूप आहे, नदी तलाव फुल्ल आहे. काळजी घेऊज विसर्जन करावे. नाशिकला पूर आला आहे. सर्वांनी काळजी घ्यावी खोल पाण्यात जाऊ नये. सेल्फीच्या नादात आनंदात दुःखाचा क्षण घेऊ नये काळजी घ्यावी".