Team Lokshahi
ताज्या बातम्या

मुंबईत पोलिसांच्या हातातून निसटले सराईत चोरटे कल्याणमध्ये गजाआड

आंबिवली परिसरात राहणाऱ्या दोन संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोन तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर जी माहिती समोर आली ते ऐकून पोलीस हैराण झाले.

Published by : shweta walge

अमजद खान, कल्याण : मुंबईमध्ये लुटीच्या घटनेनंतर तीन अट्टल चोरटे पोलिसांच्या हातून निसटले होते. या तिघांपैकी दोघांनी कल्याणमध्ये येऊन एका वयोवृद्ध महिलेचे दागिने हिसकावून फरार झाले. अखेर सुनील फुलारे आणि गणेश जाधव या दोन्ही चोरट्यांना कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकत त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत.

कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवलीत गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण 80 टक्केवर पोहोचला आहे. यासाठी कल्याण डोंबिवलीतील पोलिसांनी अथक प्रयत्न केले आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये विशेष पथक तयार करून अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. काही दिवसापूर्वी कल्याणनजीक असलेल्या आंबिवली परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील साखळी हिसकावून दोन चोरटे बाईकवर बसून पसार झाले. घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. ही घटना खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आणि पीआय शरद जिने यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अनिल गायकवाड यांनी सीसीटीव्हीच्या साह्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला. अखेर आंबिवली परिसरात राहणाऱ्या दोन संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोन तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर जी माहिती समोर आली ते ऐकून पोलीस हैराण झाले.

कारण या दोघांचा शोध मुंबई पोलीस देखील करत होते. या दोघांनी आणखी एका मित्रासोबत मुंबई येथील चुनाभट्टी परिसरात एका लुटीच्या घटना केली होती. बाईकवर पळताना त्यांची बाईक रस्त्यावर स्लिप झाली. एक पोलीस या चोरट्यांचा मागे होता थोड्यावेळात पोलीस व्हॅन मध्ये बसून पोलीसने देखील यांचा पाठलाग केला मात्र चोरटे हाती लागले नाही . अखेर खडकपाडा पोलिसांनी या चोरट्यांना अटक करून यांच्याकडून सात गुन्हे उघडकीस आणले आहेत एवढेच नाही तर चोरीस गेलेल्या 7 बाईक सुद्धा हस्तगत केल्या आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Patil : "मिळालेलं प्रमाणपत्र अंतरवालीत आणा, मला बघायचंय"; मराठवाड्यात वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रावर जरांगेंना संशय

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका