ताज्या बातम्या

Raj Thackeray - Uddhav Thackeray Reunion : हिंदी सक्तीच्या निर्णयावर राज्य सरकारला बॅनरबाजीच्या माध्यमातून टोला

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बाहेर शिवसेना ठाकरे गटाने लावलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

Published by : Team Lokshahi

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बाहेर शिवसेना ठाकरे गटाने लावलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. "ठाकरे हे केवळ नाव नाही, ती ताकद आहे जी सरकारलाही झुकवते," या मजकुराच्या माध्यमातून ठाकरे गटाने राज्य सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हातमिळवणी करत असल्याचा फोटोही झळकवण्यात आला आहे.

हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 5 जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, याआधीच राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने दोन्ही पक्षांचे नियोजित आंदोलन रद्द झाले. यानंतर दोन्ही पक्षांनी बॅनरबाजीच्या माध्यमातून आपली आक्रमक भूमिका मांडली.

मनसेनेही दादर येथील शिवसेना भवनासमोर एक वेगळ्या प्रकारचा बॅनर लावला आहे. या बॅनरमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा फोटो दाखवून त्यांच्या दैनंदिन धोकादायक प्रवासाची व्यथा मांडण्यात आली आहे. नदीवर पूल नसल्यामुळे मुले झाडांच्या फांद्या पकडून नदी पार करत शाळेत जातात. हा फोटो दाखवत मनसेने विचारले आहे, "राज्य शासनाला यापेक्षा हिंदी सक्ती अधिक महत्त्वाची वाटते का?". या घडामोडींमुळे ठाकरे बंधूंनी हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र येण्याचा प्रयत्न केला का, यावरही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा