ताज्या बातम्या

राजेश टोपेंमुळे कोरोना काळात तीन लाख लोकांचा मृत्यू - भाजपा आमदार बबनराव लोणीकर

Published by : Siddhi Naringrekar

कोरोनामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला. सगळीकडे या कोरोनाने हाहाकार माजवला होता. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांच्या मुखड्यामुळे कोरोना काळात महाराष्ट्रात तीन लाख लोकांचा मृत्यू झाला, असा आरोप भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे.

बबनराव लोणीकर म्हणाले की, "राजेश टोपेंनी सांगितलं की ग्लोबल टेंडर काढतो आणि 12 कोटी लस विकत घेतो. महाराष्ट्राने कधी ऐकला नाही तो इंग्रजी शब्द राजेश टोपेंनी सांगितला. ग्लोबल टेंडर काढायचा आणि सहा हजार कोटींची लस विकत घ्यायची सरकारची तयारी आहे. रोज हा मुखडा टीव्हीवर यायचा. बोलाचा भात अन् बोलाचीच कडी. नुसत्याच गप्पा मारल्या आणि तीन लाख लोकांचा मृत्यू झाला महाराष्ट्रात. त्याचं बोलणं सुरु झालं की लोक मान हलवायचे. पहिल्या दिवशी सांगायचे ग्लोबल टेंडर काढणार, दुसऱ्या दिवशी सांगायचे मोदी शाह लस देत नाहीत. केंद्र सरकारने लस दिली नसती तर काय झालं असतं महाराष्ट्रात. 12 कोटी जनता आहे, अर्धा महाराष्ट्र रिकामा झाला असता. अजित पवार, मुख्यमंत्र्यांनी ग्लोबल टेंडर काढण्याची घोषणा केली. गाणं आहे ना लबाड लांडगं ढोंग करतंय, लस आणायचं सोंग करतंय. यांनी सुद्धा मोदींची फुकट लस घेतली. एक लस खरेदी केली नाही. मोदींनी महाराष्ट्राच्या 12 कोटी लोकांना लस दिली."

जालना जिल्ह्यातल्या परतूरमध्ये सेवा समर्पण सप्ताह निमित्त धन्यवाद मोदीजी या अभियानाची माहिती देताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ग्लोबल टेंडरच्या नावाखाली आघाडी सरकारने जनतेची फसवणूक केली आणि एकही लस विकत घेतली नाही. त्यामुळे लबाड लांडगं ढोंग करतंय लस आणण्याचं सोंग करतंय, असं म्हणत राजेश टोपेंवर आरोप केला आहे.

'अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील' अजितदादांच धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांची खरमरीत टीका

'प्रकाश आंबेडकर धनदांडग्यांच्या पाठिशी' प्रकाश शेंडगे यांची टीका

Uddhav Thackeray : 'मोदींवर संकट आलं तर मीही मदतीला धावून येईन, पण...', ठाकरेंचा PM मोदींना टोला

Loksabha Election 2024 : देशभरातील 12 राज्यांतील 94 जागांसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, आज आणि उद्या समुद्रकिणारी जाणं टाळावं, धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता