Bhagwant Mann Team Lokshahi
ताज्या बातम्या

Bhagwant Mann Marriage : आज पंजाबचे CM भगवंत मान दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात

मुख्यमंत्री भगवंत मान यांचे हे दुसरे लग्न असून भगवंत मान यांच्या लग्नाचे आयोजन चंदीगडमध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासह काही खास व्यक्तींचाच सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आज पंजाबचे (PUNJAB) CM भगवंत मान (Bhagwant mann ) आम आदमी पक्षाचे नेते पुन्हा एकदा विवाहबंधनात (weeding) अडकणार आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान यांचे हे दुसरे लग्न असून भगवंत मान यांच्या लग्नाचे आयोजन चंदीगडमध्ये (Chandigarh ) होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासह काही खास व्यक्तींचाच सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

Bhagwant Mann

भगवंत मान हे 48 वर्षांचे असून, ते दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. भगवंत मान यांनी पहिली पत्नी इंद्रप्रीत कौरपासून घटस्फोट घेतला आहे. त्यांना दोन मुले आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी भगवंत मान हे राज्यातील संगरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 आणि 2019 मध्ये ते सलग दोन वेळा खासदार झाले.

भगवंत मान यांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांची दोन्ही मुले शपथविधी सोहळ्याला आली होती. भगवंत मान यांच्या आईची इच्छा होती, त्यांनी दुसरं लग्न कराव. भगवंत मान यांचा विवाह मुख्यमंत्र्यांच्या आई आणि बहिणीने निवडलेल्या मुलीशी म्हणजेच डॉ. गुरप्रीत कौरशी होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया