ताज्या बातम्या

कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या गुगलचा आज 24वा वाढदिवस

Published by : Siddhi Naringrekar

जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन गुगल आज आपला 24 वा वाढदिवस साजरा करीत आहे. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असणारा, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांचा हक्काचा मित्र म्हणजे 'गुगल. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांनी १९९८ मध्ये एक नवे सर्च इंजिन सुरू केलं. या माध्यमातून जगभरातील माहिती सर्वांना उपलब्ध होईल आणि तीही अगदी मोफत...आणि आता वीस वर्षांनंतर 'गुगल' १५० पेक्षा अधिक भाषांमध्ये आणि १९० देशांमध्ये उपलब्ध आहे.स्टॅनफोर्ड विद्यापीठात सर्गी ब्रिन आणि लॅरी पेज यांची भेट झाली. आणि त्यातूनच भविष्यात 'गुगल चं भव्य स्वरूप होऊ शकतं, हे त्यांना जाणवलं आणि भागीदारीचा निर्णय घेण्यात आला.

Google.com डोमेन १५ सप्टेंबर १९९५ रोजी नोंदणीकृत होते. Google ४ सप्टेंबर १९९८ रोजी कंपनी म्हणून नोंदणीकृत केले होते. २७ सप्टेंबर रोजी गुगल सर्च इंजिनवर रिकॉर्ड नंबर पेज सर्च केले गेले. तेव्हापासून गुगलचा वाढदिवस या दिवशी साजरा केला जातो. गुगल आज जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. आज तुम्ही गुगलच्या माध्यमातून १०० पेक्षा जास्त भाषांमध्ये तुम्ही माहिती शोधून घेऊ शकता.

कंपनीचे नाव सुरुवातीला 'गुगल' असे नव्हते. ब्रिन आणि पेज यांना सुरुवातीला कंपनीचे नाव 'बॅकरब' असे ठेवायचे होते. मात्र, या जोडगोळीनं तो विचार बदलून 'गुगल' असं नाव ठेवण्याचा निर्णय घेतला. इंटरनेट सर्च इंजिन म्हणून गुगल हे आज जगातील सर्वात मोठे प्लेटफॉर्म आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची माहिती मिळवायची असते तेव्हा गुगलद्वारे सर्च करून संपूर्ण माहिती मिळवता येते. जवळजवळ प्रत्येक प्रश्नाच आणि प्रत्येक माहिती गुगल जवळ आढळते.

किरण सामंत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

उज्जवल निकम आज राज ठाकरे यांची भेट घेणार

"हे मोदी सरकार नव्हे, हे तर गजनी सरकार"; उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर डागली 'मशाल'

"कुणी भारताला थप्पड मारली, तर त्याचा जबडा तोडण्याची हिंम्मत आजच्या भारताकडे आहे", सोलापूरात योगी आदित्यनाथ कडाडले

"देशातील वाढत्या महागाईला नरेंद्र मोदीच जबाबदार", मविआच्या सभेत शरद पवारांचा महायुतीवर घणाघात