Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : तब्बल १८ वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार असून त्यामुळे दादरच्या वरळी डोममध्ये कार्यकर्त्यांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. आजचा दिवस हा अत्यंत डोळे दिपवणारा दिवस असून हा दिवस मराठी भाषेच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून "मराठी विजय दिन" साजरा करण्यात येणार असल्याचे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले.
हिंदी सक्तीचा जीआर सरकारने मागे घेतल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे विजयी मेळाव्यासाठी एकत्र येणार आहेत. या विजयी सोहळयाला अनेक मराठी कलाकारांनीही हजेरी लावली आहे. आज केवळ राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नसून आदित्य ठाकरे, अमित ठाकरे,मिताली ठाकरे, तेजस ठाकरे शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठकरे हे सुद्धा या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येणार असल्याचे चित्र आहे.
नुकतेच उद्धव ठाकरे सहकुटुंब वरळी डोम इथे दाखल झाले आहेत. सहकुटूंब सहपरिवार असे आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असून एकंदरीतच संपूर्ण कुटुंबच एकत्र येणार असल्याचे विलोभनीय दृश्य वरळीमध्ये पाहायला मिळणार आहे. विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधूंचे जागोजागी बॅनर्स लावण्यात आले आहेत.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे या विजयी मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आज दोन्ही बंधूंचे कुटुंब एकत्र येणार असल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणात यावेळी पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने ‘आवाज मराठीचा! असा भावनिक संदेश सगळीकडे झळकत आहे.
हेही वाचा...