Admin
ताज्या बातम्या

उदयनराजे आज रायगड किल्ल्यावर; काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उदयनराजे आक्रमक झाले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे. यावरुन उदयनराजे आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूवर उदयनराजेंनी शिवसन्मानाचा निर्धार केला. आज ते रायगडावर येणार आहेत. शिरकाई, जगदिश्वर मंदिराला अभिवादन केल्यानंतर उदयनराजे शिवभक्तांना संबोधित करणार आहेत. उदयनराजे आज नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसन्मानासाठी ‘चलो रायगड’ अशी हाक दिल्याने हजारो शिवभक्त आणि उदयनराजे समर्थक महाडमध्ये दाखल होत आहेत.संपूर्ण रायगडावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, प्रशासन सज्ज झाले आहे.

उदयनराजे भोसले यांनी ‘शिवरायांचा अपमान पाहण्यापेक्षा मेलो असतो, तर बरं झालं असतं,’ अशी भावना व्यक्त केली आहे. शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावर पुष्पहार अर्पण केल्यानंतर खासदार उदयनराजे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो! आज लोकलचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा