ताज्या बातम्या

खा. उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची भेट; मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी केली मोठी मागणी

Published by : Siddhi Naringrekar

प्रशांत जगताप, सातारा

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होत आहे या विस्तारापूर्वी एक दिवस अगोदर साताऱ्याचे राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली.. खासदार उदयनराजे भोसले यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे.. उदयनराजे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना समक्ष भेटून निवेदन ही सादर केले आहे.

या निवेदनात मराठा आरक्षण हा जिव्हाळ्याचा विषय आहे, हा प्रलंबित विषय तातडीने मार्गी लागला पाहिजे मराठा, आरक्षणाबाबत घोषणा होतात मात्र प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे याबाबतची मागणी केली आहे.

या सरकारमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेल इतर कुठल्याही समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्याकडे अनेक वर्षापासून दुर्लक्ष होत आहे हे व्हायला नको, मराठा समाजातील लोक सदन आहेत असे सांगितले जाते मात्र मराठा समाजातील 90% हून अधिक लोक आर्थिक दुर्बल आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली असून भविष्यात त्याचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे या निवेदनात म्हटले आहे.

MI VS SRH: सुर्यकुमार यादवचे नाबाद शतक! हैदराबादचे 7 गडी राखून केला पराभव

Madha Lok sabha Election 2024 : माढ्यात आचारसंहितेचा भंग, मतदान केंद्रात मोबाईल कॅमेऱ्याचा वापर

Baramati : सुप्रिया सुळेंची दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल, निवडणूक आयोग कारवाई करणार का?

आमदार भरणेंनी शिवीगाळ केलेला व्हिडिओ रोहित पवारांनी केला ट्विट

हातकणंगलेमध्ये गोंधळ, दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी