udaypur murder | nupur sharma | murder case team lokshahi
ताज्या बातम्या

नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्याची हत्या करुन व्हिडिओ केला शेअर, दोघांना अटक

नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्याची हत्या करुन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर राज्यस्थानमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. संपुर्ण राजस्थानातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून कलम 144 लागू केला आहे.

Published by : Shubham Tate

nupur sharma udaypur murder case : राजस्थानमधील उदयपूर शहरातील धनमंडी पोलीस स्टेशन हद्दीतील मालदास स्ट्रीट येथे भरदिवसा दोघांनी एका तरुणाचा गळा चिरून खून (murder) केला. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्याची हत्या करुन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर राज्यस्थानमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. संपुर्ण राजस्थानातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून कलम 144 लागू केला आहे.

मृत तरुणाच्या मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर (Social media) पोस्ट केल्याचे सांगितले जात आहे. याचा राग येऊन आरोपीने वडिलांची निर्घृण हत्या केली. या हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. इंटरनेट बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पुढील २४ तास इंटरनेट बंद राहणार आहे. माहिती मिळताच धानमंडी व घंटाघर पोलीस ठाण्याने घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी मृतदेह एमबी हॉस्पिटलच्या शवागारात ठेवला. (udaypur murder 8 year old boy tweeted support nupur sharma angry people killed father)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत कन्हैयालालच्या आठ वर्षीय मुलाने मोबाईलवरून नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यानंतर काही लोक संतापले आणि दोन आरोपींनी धारदार शस्त्राने तरुणाची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर हिंदू संघटनेत संताप आहे. दोन मुस्लिम आरोपींनी तलवारीने गळा चिरून युवकाची हत्या केली. या प्रकरणी आरोपींनी व्हिडीओ जारी करून हत्येची जबाबदारीही स्वीकारली आहे. असे कृत्य पुन्हा होऊ नये म्हणून मारेकऱ्यांना फाशी द्यावी, असे लोकांचे म्हणणे आहे. तरुणाच्या शिरच्छेदाच्या निषेधार्थ स्थानिकांनी या घटनेनंतर मालदास गली परिसरातील दुकाने बंद ठेवली आहेत.

आरोपीच्या घरावर पोलिसांचे छापे

दोन्ही आरोपींच्या घरावर पोलीस छापे टाकत आहेत. हत्येचा आरोपी रियाझ मोहम्मद याने १७ तारखेलाच व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ शेअर करणार असल्याचा दावा केला होता. उदयपूर पोलीस रियाझ मोहम्मदचा शोध घेत आहेत. गेल्या 10 वर्षांपासून रियाझ उदयपूरमध्ये राहत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज हा भिलवाडा येथील असिंद भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे. गौस मोहम्मद असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. दोघेही उदयपूरच्या खांजीपीर भागात राहत होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली