राज्यभरात सुरु असलेला हिंदी भाषासक्ती वाद पेटून उठलेला पाहायला मिळाला आहे. यादरम्यान 5 जूलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हिंदी सक्ती विरोधात मोर्चा देखील काढणार होते. मात्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही GR मागे घेतल्यामुळे आता हा मोर्चा न होता दोन्ही ठाकरे बंधू आझाद मैदानात मेळावा घेताना पाहायला मिळणार आहेत.
दरम्यान आज उद्धव ठाकरे यांनी जनसुरक्षा विधेयकाविरोधात आंदोलन करत आझाद मैदानातून सरकारवर जोरदार टीका करत हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी अनेक मुद्दे भाषणावेळी मांडले. यावेळी त्यांच्यासोबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, "गेल्या काही महिन्यात असं काही घडलं आहे की, विधानसभेत निकाल देखील उलटा आला".
"सध्या जे भाजपात जात आहेत ते साधू संत आहेत त्यामुळे जर भाजपात गेले की, त्यांनी सर्व माफ होऊन जात. पण जे भाजपाच्या विरोधात जातील ते देशद्रोही आहेत. लढणार असाल तर शिवसेना तुमच्यासोबत आहे. बहुमत त्यांच्याकडे असले तरीही रस्त्यावरील जनता माझ्यासोबत आहे. शेतकऱ्यांना नक्षलवादी ठरण्याचे काम करण्यात आल्याचेही" उद्धव ठाकरेंनी म्हटले.