Sanjay Raut 
ताज्या बातम्या

फडणवीसांच्या काळात 20 वेळा ओवैसी औरंगजेबाच्या कबरीवर गेला, तेव्हा...

हनुमान चालीसा वाचली तर लडाखमध्ये घुसलेले चीनचे सैन्यही पळून जाईल...

Published by : Team Lokshahi

Shiv Sena Rally | BKC Mumbai : मुंबईत आज शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या (Shiv Sampark Abhiyan) कार्यक्रमाचं केले होते. या सभेत शिवसेना नेते यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे खूप मोठा दारुगोळा घेऊन येणार आहे. आजची शिवसेनेची सभा ही १०० शिवसेनेच्या बाप असेल. आजची सभा सांगत आहे की, मुंबईचा बाप फक्त शिवसेनाच. आमचा बाप एकच हिंदू हदय सम्राट बाळासाहेब ठाकेरच. आम्ही कोणापुढे झुकणार नाही. दबणार नाही. आज उसळलेला महासागर, हिंदुत्वाचा लाटा आहे. आजच्या या हिंदूच्या महासागराने हनुमान चालीसा वाचली तर लडाखमध्ये घुसलेले चीनचे सैन्यही पळून जाईल.

संभाजी महाराजांची आज जयंती आहे. शिवसेनेचे हिंदुत्व संभाजी महाराजांसारखे आहे. काल औरंगाबादला तो ओवैसी आला. त्याने औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक झाला. त्याचा आम्ही निषेध करतोच. परंतु तो ओवैसी आतापर्यंत काँग्रेस काळात, भाजप काळात औरंगजेबच्या कबरीपुढे आला. तेव्हा का नाही कारवाई केली.

गुजरातमध्ये जन्मला आला औरंगजेब जन्मला आला. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले महाराष्ट्रात. छत्रपती त्या औरंगजेबकडून जे भोगले ते आज महाराष्ट्र भोगत आहे.

हिंदुत्व खतऱ्यात कोणामुळे आले हे काश्मिरात पाहा. त्या ठिकाणी काश्मिरी पंडितांची हत्या होत आहे. शिवसेनाला महाराष्ट्रात कोणी शिकवू नये.

आता आयोध्या १५ जूनला

राज्यसभेची निवडणुकीमुळे आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा १० जून ऐवजी १५ जुनला होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द