Drowning | Nandurbar News team lokshahi
ताज्या बातम्या

Nandurbar मध्ये नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यू

नदी ओलांडताना तिघे बुडाले

Published by : Shubham Tate

नंदुरबार (प्रशांत जव्हेरी) :

नंदुरबारमध्ये (Nandurbar) राहत असलेल्‍या ठिकाणावरून दुसऱ्या पाड्यावरील दुकानात सामान घेण्यासाठी जाताना ही घटना घडली. नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा खोल खड्यात बुडून मृत्यू झाल्‍याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (१५ जून) दुपार घडली. याबाबत रात्री उशिरा तक्रार दाखल झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (unfortunate death of three children while crossing the river in Nandurbar)

धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा येथे वास्‍तव्‍यास असलेले तीन चिमुकले आईने सांगितलेले सामान आणण्यासाठी दुसऱ्या पाड्यावरील किराणा दुकानात जात होते. या दरम्‍यान देवानंद नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. नदीतील पाण्यात खोल खड्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. निलेश दीलवर पाडवी (वय 4), मेहेर दिलवर पाडवी (वय 5) आणि पार्वती अशोक पाडवी (वय 5) अशी या मुलांची नावं आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा