Admin
Admin
ताज्या बातम्या

कोकण रेल्वे मार्गावरचा वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त ठरला; 'या' दिवशी पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

Published by : Siddhi Naringrekar

निसार शेख, रत्नागिरी

अनेक दिवस मोठी उत्सुकता लागून राहिलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसचा अखेर मुहूर्त ठरला आहे. मडगाव - मुंबई सीएसएमटी वंदे भारतला अखेर ३ जून २०२३ रोजी हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. ३जून रोजी वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तेव्हा आता वंदे भारत एक्सप्रेसचा उद्घाटनाचा मुहूर्त अतिसमीप आला आहे. ५ जूनपासून ही सेमी हाय स्पीड ट्रेन प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे.

अशी खात्रीशीर माहिती कोकण रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या ट्रेनला रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी व खेड येथे थांबा देण्यात आला आहे. वंदे भारत हायस्कूल ट्रेनच्या उद्घाटनासाठी गोवा येथील मडगाव रेल्वे स्थानक सज्ज करण्यात आले आहे. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. 5 जून पासून नियमित होणारी ही गाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ही गाडी पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी, ठाणे येथून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी, पनवेल येथून सकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी मिनिटांनी, खेड येथून सकाळी आठ वाजून 40 मिनिटांनी तर रत्नागिरीला भारत एक्सप्रेस सकाळी दहा वाजता येईल. दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी ही गाडी गोव्यात मडगाव ला पोहोचेल. मडगाव येथून वंदे भारत एक्सप्रेस दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी मुंबईसाठी सुटेल.

परतीच्या प्रवासात असतानाही गाडी रत्नागिरी येथून सायंकाळी ५ वाजून 35 मिनिटांनी असेल. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ही गाडी पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी, ठाणे येथून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी, पनवेल येथून सकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी मिनिटांनी, खेड येथून सकाळी आठ वाजून 40 मिनिटांनी तर रत्नागिरीला भारत एक्सप्रेस सकाळी दहा वाजता येईल. दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी ही गाडी गोव्यात मडगाव ला पोहोचेल. मडगाव येथून वंदे भारत एक्सप्रेस दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी मुंबईसाठी सुटेल. परतीच्या प्रवासात असतानाही गाडी रत्नागिरी येथून पाच वाजून 35 मिनिटांनी तर खेड इथून सहा वाजून 48 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना होईल.

मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ला ही गाडी रात्री दहा वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल.या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे थांबा देण्यात आला आहे. मुंबईकडून मडगावकडे जाताना कणकवली येथे ही गाडी अकरा वाजून वीस मिनिटांनी पोहोचेल. मडगाव येथून सुटल्यावर मुंबइकडे जाताना कणकवली येथे ४ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. रायगड जिल्ह्यात रोहा व पनवेल येथे थांबा देण्यात आला आहे. मडगाव कडून मुंबईच्या दिशेने जात असताना रोहा येथे रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल पनवेल येथे अजून नऊ वाजून अठरा मिनिटांनी पोहोचेल. मुंबईवरून मडगाव कडे जाताना रोहा येथे सकाळी सात वाजून 45 मिनिटांनी तर पनवेल येथे सकाळी सहा वाजून 38 मिनिटांनी पोहोचेल.

निवडणूक आयोगाला फटकारणाऱ्या उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर, ट्वीटरवर म्हणाले, "त्यांचा पराभव स्पष्टपणे..."

Daily Horoscope 21 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या धन-संपत्तीत होणार बक्कळ वाढ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 21 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"मोदी पराभवाच्या भीतीमुळं निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करतात"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

IPL 2024 Play Offs : प्ले ऑफचा सामना पावसामुळं रद्द झाल्यास पुढे काय होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती