ताज्या बातम्या

नितीन गडकरी यांचा काटा काढण्याचा प्लान, विजय वडेट्टीवार यांचा मोठा गौप्यस्फोट

मोदी सरकारच्या सहा योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या अहवालानुसार केंद्रातील सहा योजनांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

Published by : shweta walge

मोदी सरकारच्या सहा योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या अहवालानुसार केंद्रातील सहा योजनांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यांवर अधिक ताशेरे ओढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यावरच, नितीन गडकरी यांचा काटा काढण्यासाठीच कॅगचा अहवाल आला असल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

नितीन गडकरींचा काटा काढायचा आहे. हे अंतर्गत राजकारण आहे. कदाचित त्यामागची पार्श्वभूमी असू शकते. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार असताना कॅगने फक्त गडकरींच्या खात्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यावरून सर्व काही स्पष्ट होतं. गडकरींची प्रतिमा स्वच्छ आहे. विकासाची आहे. त्यातून त्यांना साईड ट्रॅक करायचं. त्यांचं राजकारण संपवायचं हा डाव असू शकतो. गडकरींना राज्यपालांची ॲाफर दिली गेली, पण त्याला त्यांनी नकार दिल्याने त्यांना बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरू झालेत. असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

सिनेट निवडणुकीबाबत काय म्हणाले?

सिनेट निवडणुकीत पराभव दिसत असल्याने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. सर्व्हे निगेटीव असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेतल्या जात नाहीत.

दरम्यान, मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक अचानक स्थगित झाली आहे. 9 ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला होता. मात्र आता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाने पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेल्या सिनेट निवडणुकीला पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. 

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा