ताज्या बातम्या

...तर आम्ही भारत सोडून जाणार! व्हॉट्सॲपने दिल्ली हायकोर्टाला दिला इशारा, नेमकं काय घडलं?

Published by : Dhanshree Shintre

सर्वात लोकप्रिय अ‍ॅप व्हॉट्सॲपने भारत सोडण्याचा पवित्रा घेतल्याने एकच खळबळ उडाली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपने स्पष्टपणे सांगितले आहे की, जर त्यांना संदेशांचे एन्क्रिप्शन काढण्यास सांगितले तर ते भारत सोडून जाईल. व्हॉट्सॲपने दिल्ली उच्च न्यायालयात नमूद केले की, कंपनीला मेसेज एन्क्रिप्शन तोडण्यास भाग पाडल्यास ते भारतामधील त्यांची सेवा प्रभावीपणे बंद करतील. व्हॉट्सॲप हे मेटा-मालकीचे भारतामधील एक लोकप्रिय व्यासपीठ आहे.

व्हॉट्सॲपने म्हटले आहे की, त्यांचे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे रक्षण करते. व्हॉट्सॲपने एंड-टू-एंड एन्क्रिप्शन नियमाविरोधात याचिका दाखल केली आहे. व्हॉट्सॲप आणि त्याची मूळ कंपनी मेटाने IT Act 2021 च्या नियम 4(2) ला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

गुरुवारी यावरील सुनावणीदरम्यान व्हॉट्सॲपने सांगितले की, लोक व्हॉट्सॲपचा वापर केवळ त्याच्या प्रायव्हसी फिचरमुळे करतात. हे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन वापरकर्त्यांचा विश्वास वाढवण्यात आणि गोपनीयता सुनिश्चित करण्यात मोठी भूमिका बजावते. याशिवाय व्हॉट्सॲपचे म्हणणे आहे की, अशा एंड-टू-एंड एन्क्रिप्शनशी छेडछाड करणे हे व्यक्तीस्वातंत्र्याचे संरक्षण करणाऱ्या संविधानाच्या कलम 14, 19 आणि 21 चे उल्लंघन आहे.

व्हॉट्सॲपने 2021 मध्ये दाखल केलेल्या याचिकेत विनंती केली आहे की, त्यांच्या व्यासपीठावरील संदेशाचा स्त्रोत ओळखण्याचा नियम घटनाबाह्य घोषित करण्यात यावा आणि त्याबद्दल कोणताही फौजदारी खटला करू नये. IT Act 2021 च्या नियम 4(2) मध्ये असे नमूद केले आहे की, जर न्यायालय किंवा कोणत्याही सक्षम प्राधिकरणाने आदेश दिला, तर सोशल मीडिया मध्यस्थांना त्यांच्या व्यासपीठावरील माहिती किंवा संदेशाचे स्त्रोत उघड करावे लागतील.

व्हॉट्सॲप आणि मेटाने या नियमाच्या कायदेशीरपणाबद्दल तसेच त्यामुळे होणारे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन आणि त्याचा प्लॅटफॉर्मच्या कामकाजावर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून खंडपीठ आता 14 ऑगस्ट रोजी सुनावणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या IT Act विरोधातील सर्व याचिका उच्च न्यायालयात वर्ग करता याव्यात यासाठी हा बराच वेळ देण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाला फटकारणाऱ्या उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर, ट्वीटरवर म्हणाले, "त्यांचा पराभव स्पष्टपणे..."

Daily Horoscope 21 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या धन-संपत्तीत होणार बक्कळ वाढ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 21 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"मोदी पराभवाच्या भीतीमुळं निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करतात"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

IPL 2024 Play Offs : प्ले ऑफचा सामना पावसामुळं रद्द झाल्यास पुढे काय होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती