Chhatrapati Sambhajinagar Riot at PES College : छत्रपती संभाजीनगर शहरातील पीईएस (PES) महाविद्यालयात परीक्षेदरम्यान एक गंभीर प्रकार घडला आहे. ‘विद्यार्थिनींना हिजाब का घालू देत नाही?’ या मुद्द्यावरून कथित एमआयएम विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट प्राचार्य कार्यालयात घुसून गोंधळ घातल्याची घटना सोमवारी (३० जून) दुपारी घडली. या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून, यावरून संबंधितांनी केलेला धिंगाणा स्पष्ट दिसत आहे. प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर यांनी यासंदर्भात छावणी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून, सरकारी कामात अडथळा, धमकी देणे अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात प्राचार्यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी थेट संपर्क साधला असता, त्यांनी या संपूर्ण प्रकरणाशी कोणताही संबंध नाकारला आहे. "मी कोणालाही महाविद्यालयात पाठवलेले नाही," असे स्पष्ट करत त्यांनी घटनांपासून आपली स्पष्ट फारकत घेतली आहे.
हेही वाचा...