Beed Crime : बीडमध्ये उधारीच्या वादातून महिलेला मारहाण; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  Beed Crime : बीडमध्ये उधारीच्या वादातून महिलेला मारहाण; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ताज्या बातम्या

Beed Crime : बीडमध्ये उधारीच्या वादातून महिलेला मारहाण; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बीड गुन्हा: उधारीच्या वादातून महिलेला मारहाण; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Published by : Riddhi Vanne

Woman Beaten up in Beed Over Borrowed Money After Minor Dispute : बीडमध्ये गुन्हेगारी काही संपण्याचे नाव घेत नाहीये. केज तालुक्यात उधारीच्या पैशाच्या वादातून एका महिलेला निर्घृण मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चंद्रकला गदळे या महिलेवर कालिंदा डोईफुडे हिने सकाळच्या वेळेत घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, चंद्रकला गदळे यांनी कालिंदा डोईफुडे यांच्याकडे दिलेले उधारीचे पैसे परत मागितले होते. त्यावरून दोघींमध्ये वाद निर्माण झाला. चंद्रकला गदळे यांनी लोकशाही मराठीशी संवाद साधताना सांगितले की, “मी सकाळी उठून घरात झाडू मारत होते, तेवढ्यात कालिंदा दारातून आत आली आणि केसाला धरून फरफटत बाहेर ओढलं. नंतर रस्त्यावरून मला ओढत नेऊन तिने मारहाण केली.”

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मारहाणीचे कारण फक्त उधारीचे पैसे मागणे हेच आहे. चंद्रकला गदळे यांच्या घरात शिरून मारहाण करण्यात आल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंद्रकला यांनी पुढे सांगितले, “ती बाई सकाळी सकाळी आली, मला घरात गाठून केस पकडून फरफटत रस्त्यावर नेलं. मला सगळ्यांसमोर मारहाण केली. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली त्या नंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा...

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shivsena : Eknath Shinde : शिवसेनेचा आज जाहीर मेळावा; एकनाथ शिंदे काय बोलणार?

Latest Marathi News Update live : पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा

Latest Marathi News Update live : 'ज्यांना सगळं काही दिलं ते गद्दार झाले'; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Aajcha Suvichar- आजचा सुविचार