इतर

Anger Management Tips : रागीट मुलांना असे करा शांत, पालकांनी या गोष्टींची घ्यावी काळजी!

Published by : Shweta Chavan-Zagade

Anger Management Tips : लहानमुलांच्या हातामधून एखादी गोष्ट हिसकावून घेणे, त्यांना मारणे किंवा खूप जोरात ओरडणे आणि त्यांचे न ऐकणे या गोष्टी केल्याने लहान मुलांची चिडचिड होते. पालकांची ही वागणूक त्यांना लाजिरवाणी वाटते. या काळामध्ये पालकांनी आपल्या सर्व गोष्टी ऐकाव्यात असे त्यांना वाटत असते. पण तसे न झाल्याने ते दुखवले जातात. कुटुंबात शांतता राखण्यासाठी मुलं आनंदी असणं फार गरजेचं असतं. त्यासाठी पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं, याबाबत जाणून घेऊयात.

मन गुंतवा

मुलांच्या रागाला वाईट वर्तवणुकीपासून लांब ठेवण्यासाठी त्यांना सतत व्यग्र ठेवा. त्यांच्या दिनक्रमात काही बदल केल्यास रागावर नियंत्रण मिळवता येईल.

मुलांसोबत मित्रत्वाचे संबंध ठेवा...

मुलांना जास्त राग येऊ नये म्हणून पालकांनी त्यांच्यासोबत नेहमी मैत्रीपूर्ण संवाद ठेवा. त्यामुळे पालकांना कोणत्या गोष्टी सांगव्यात आणि कोणत्या नाही, याची भीती पाल्यांच्या मनात राहणार नाही. तसेच मुलांच्या आयुष्यातील काहीही समस्या असल्यास त्याला पालकांच्या मदतीनं सोडवण्यास मदत होईल.

मुलांना सेफ झोन देत रहा...

मुलं कधीही कोणत्याही समस्येत किंवा संकटात असतील तर त्यांना पालकांसोबत मनमोकळेपणानं बोलता यायला हवं, असा सेफ झोन पालकांनी घरात पाल्यांना तयार करून द्यायला हवा. त्यामुळं मुलांना कोणत्याही प्रकारचं मानसिक दडपण राहणार नाही आणि मुलांना कोणत्याही प्रकारचा रागही येणार नाही.

वीकेंडमध्ये फिरायला जायला हवं...

पालकांनी प्रत्येक महिन्याला दोन ते तीन दिवस पालकांसोबत बाहेर फिरायला जायला हवं. त्यामुळं त्यांची स्ट्रेस लेवल कमी होण्यास मदत होईलच याशिवाय त्यांचं पालकांशी असलेलं नातं आणखी घट्ट होण्यास मदत होईल.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा