Dinvishesh 06 April 2024 : सध्या एप्रिल महिना सुरू झाला आहे. तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 06 एप्रिल रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२०००: मीर या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले सोयूझ हे अंतराळयान मीर ला भेटले.
१९९८: भारतापर्यंत सहज पोहोचू शकणाऱ्या;या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.
१९८०: भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले.
१९६६: भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.
१९६५: व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला अर्ली बर्ड हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला
१९१७: पहिले महायुद्ध - अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१८९६: आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.
१६५६: शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
आज यांचा जन्म
२०००: शाहीन आफ्रिदी - पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९८८: इव्होन ओरसिनी - मिस वर्ल्ड पोर्तो रिको २००८, मॉडेल आणि दूरदर्शन होस्ट
१९६३: राफेल कोरिया - इक्वेडोरचे ५४वे अध्यक्ष, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी
१९५६: दिलीप वेंगसरकर - भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक
१९५६: मुदस्सर नजर - पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९४९: हॉर्स्ट लुडविग स्टॉर्मर - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार
१९३१: सुचित्रा सेन - भारतीय बंगाली व हिंदी अभिनेत्री - पद्मश्री (निधन: १७ जानेवारी २०१४)
१९२९: क्रिस्टोस सार्टझेटाकीस - ग्रीस देशाचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायमूर्ती (निधन: ३ फेब्रुवारी २०२२)
१९२८: जेम्स वॉटसन - अमेरिकन जीवशास्त्रज्ञ, अनुवंशशास्त्रज्ञ आणि प्राणीशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार
१९२७: व्ही. एम. जोग - भारतीय उद्योजक (निधन: २८ जून २०००)
१९२०: एडमंड एच. फिशर - स्विस-अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: २७ ऑगस्ट २०२१)
१९२०: जॅक कव्हर - अमेरिकन पायलट आणि भौतिकशास्त्रज्ञ, टेसर गनचे संशोधक (निधन: ७ फेब्रुवारी २००९)
१९१९: रघुनाथ विष्णू पंडित - कोंकणी कवी
१९१८: अल्फ्रेडो ओवांडो कॅंडिया - बोलिव्हिया देशाचे ५६वे राष्ट्राध्यक्ष (निधन: २४ जानेवारी १९८२)
१९१७: सुधांशु - मराठी कथाकार व कवी (निधन: १८ नोव्हेंबर २००६)
आज यांची पुण्यतिथी
२०१४: मॅसिमो तंबुरीनी - इटालियन मोटरसायकल डिझायनर, बिमोटाचे सहसंस्थापक (जन्म: २८ नोव्हेंबर १९४३)
२००५: रेनियर III - मोनॅकोचे प्रिन्स (जन्म: ३१ मे १९२३)
२००३: अनिता बोर्ग - अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, अनिता बोर्ग इन्स्टिट्यूट फॉर वुमन अँड टेक्नॉलॉजीच्या संस्थापिका (जन्म: १७ जानेवारी १९४९)
२०००: हबीब बोरगुइबा - ट्युनिशिया देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: ३ ऑगस्ट १९०३)
१९९५: इओनिस अलेव्ह्रास - ग्रीस देशाचे अध्यक्ष, बँकर आणि राजकारणी
१९९४: जुवेनल हब्यारीमाना - रवांडा देशाचे ३रे अध्यक्ष, बँकर आणि राजकारणी (जन्म: ८ मार्च १९३७)
१९९४: सायप्रियन न्तार्यामिरा - बुरुंडी देशाचे ५वे अध्यक्ष (जन्म: ६ मार्च १९५५)
१९९२: आयझॅक असिमॉव्ह - अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (जन्म: २ जानेवारी १९२०)
१९८९: पन्नालाल पटेल - गुजराथी कथा-कादंबरीकार - ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: ७ मे १९१२)
१९८३: जनरल जयंतोनाथ चौधरी - भारताचे ५वे लष्करप्रमुख - पद्म विभूषण (जन्म: १० जून १९०८)