लोकशाही स्पेशल

दिनविशेष 11 जानेवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Team Lokshahi

Dinvishesh 11 January 2024 : सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 11 जानेवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२०००: छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना.

१९९९: कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी.

१९८०: बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.

१९७२: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.

१९६६: गुलजारीलाल नंदा - यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.

१९४२: दुसरे महायुद्ध जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले.

१९२२: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.

१७८७: विल्यम हर्षेल यांनी टिटानिया आणि ओबेरॉन या युरेनसच्या चंद्राचा शोध लावला.

आज यांचा जन्म

१९७३: राहुल द्रविड़ - भारतीय क्रिकेटपटू - पद्म भूषण, पद्मश्री

१९५५: आशा खाडिलकर - उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका

१९४४: शिबू सोरेन - झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री आणि खासदार

१८५९: लॉर्ड कर्झन - ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय (निधन: २० मार्च १९२५)

१८५८: श्रीधर पाठक - हिंदी साहित्यिक (निधन: १३ सप्टेंबर १९२६)

१८१५: जॉन ए. मॅकडोनाल्ड - कॅनडाचे पहिले पंतप्रधान (निधन: ६ जून १८९१)

आज यांची पुण्यतिथी

२००८: यशवंत फडके - मराठी लेखक आणि इतिहास संशोधक (जन्म: ३ जानेवारी १९३१)

२००८: एडमंड हिलरी - शेर्पा टेन्झिंग नॉर्गे यांच्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट शीखर सर करणारे गिर्यारोहक (जन्म: २० जुलै १९१९)

१९९७: भबतोष दत्ता - अर्थतज्ञ (जन्म: २१ फेब्रुवारी १९११)

१९७८: इब्न-ए-इनशा - भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक (जन्म: १५ जून १९२७)

१९६६: लालबहादूर शास्त्री - भारताचे २रे पंतप्रधान - भारतरत्न (जन्म: २ ऑक्टोबर १९०४)

१९५४: सर जॉन सायमन - सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष (जन्म: २८ फेब्रुवारी १८७३)

१९२८: थॉमस हार्डी - इंग्रजी कादंबरीकार (जन्म: २ जून १८४०)

१८७४: गेल बोर्डन - आटवलेल्या दुधाचे शोधक (जन्म: ९ नोव्हेंबर १८०१)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Indian Woman Arrest USA : अमेरिकेत भारतीय महिलेला चोरीच्या आरोपाखाली अटक; पोलिसांच्या प्रश्नावर सोशल मीडियावर संताप

Ambadas Danve : "मी पुन्हा येईन...", विधान परिषदेतील अंबादास दानवेंचे निरोप भाषण चर्चेत

Indians Executed Abroad : 'या' देशात भारतीयांना सर्वाधिक फाशी ; निमिषा प्रिया प्रकरणानंतर आकडेवारी समोर

Israel Attack On Syria : सिरियातील लष्करी मुख्यालयावर इस्रायलचा हल्ला; तणाव वाढला