Bahinabai Chaudhari Death Anniversary : बहिणाबाईंच्या कविता विशेषतः त्यांच्या मातृभाषेवर अवलंबून आहेत, त्यांच्या कवितांचा विषयात पिहार, जग, शेतीचे साहित्य, तिचे काम इत्यादी कृषी जीवनातील विविध घटना, पोळा, गुढीपाडवा इत्यादी सणांचा समावेश आहे. देव आपल्या जीवनात कसे उपस्थित आहे, सूर्य, वारा, पाणी, आकाश, भगवान श्रीकृष्ण त्यांच्यामध्ये उपस्थित आहेत, अशा प्रकारे ते त्यांच्या कवितामध्ये लिहितात. बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी. यानिमित्त त्यांच्या खास कविता स्टेटसवर ठेवून त्यांना अभिवादन करा.
ऐका संसार,संसार
दोन्ही जीवाचा इचार
देतो दुःखाला होकार
अन् सुखाले नकार
बहिणाबाई चौधरी यांना शत शत वंदन
नको नको रे ज्योतिषा माह्या दारी नको येऊ,
माह्य दैव मले कळे माह्या हात नको पाहू
धनरेषांच्या च-यांनी तळहात रे फाटला,
देवा तुह्याबी घरचा झरा धनाचा आटला
- बहिणाबाई चौधरी
मानसा मानसा कधि व्हशील माणूस,
लोभासाठी झाला मानसाचं रे कानूस
बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
अरे खोप्या मंदि खोपा सुगरणीचा चांगला,
देख पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला
बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
अरे संसार संसार
जसा तावा चुल्यावर
आधी हाताले चटके
तवा मियते भाकर
बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन