Dinvishesh 1 October 2023 : सध्या ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 1 ऑक्टोबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
आंतरराष्ट्रीय कॉफी दिन
आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्तींचा दिन
२००१: काश्मीर आतंकी हल्ला - राज्य विधानसभेच्या इमारतीवर अतिरेक्यांनी हल्ला केला त्यात किमान ३८ लोकांचे निधन.
१९९२: कार्टून नेटवर्क चॅनल - सुरु झाले.
१९८२: सोनी - कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले.
१९७१: सीटी स्कॅनर - रुग्णाचे निदान करण्यासाठी पहिले व्यावहारिक सीटी स्कॅनर वापरले गेले.
१९७१: वॉल्ट डिस्ने वर्ल्ड, फ्लोरिडा, अमेरिका - सुरु झाले.
१९६९: कॉनकॉर्ड विमान - प्रथमच ध्वनीगती पेक्षा जोरात उडण्यात यशस्वी झाले.
१९६४: जपानी शिंकनसेन (बुलेट ट्रेन) - टोकियो ते ओसाका पर्यंत हाय-स्पीड रेल्वे सेवा सुरू.
१९६१: डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी (DIA), अमेरिका - देशातील पहिल्या लष्करी गुप्तचर संस्थेची स्थापना झाली,
१९५८: भारत - देशात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.
१९५३: आंध्र राज्य - तयार झाले.
१८३७: भारतातील पहिले टपाल कार्यालय - सुरु झाले.
आज यांचा जन्म
१९८४: चिरंजीवी सर्जा - भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते (निधन: ७ जून २०२०)
१९६६: अशब उद्दीन - भारतीय बंगाली राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते
१९५१: जी. एम. सी. बालयोगी - भारतीय वकील आणि राजकारणी, लोकसभेचे १२वे अध्यक्ष (निधन: ३ मार्च २००२)
१९४७: दलवीर भंडारी - भारतीय वकील आणि न्यायाधीश - पद्म भूषण
१९४५: इशर जज अहलुवालिय - भारतीय अर्थशास्त्र (निधन: २६ सप्टेंबर २०२०)
१९३०: जे. एच. पटेल - कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (निधन: १२ डिसेंबर २०००)
१९२८: शिवाजी गणेशन - दाक्षिणात्य अभिनेते (निधन: २१ जुलै २००१)
१९१९: मजरुह सुलतानपुरी - शायर, गीतकार आणि कवी - दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: २४ मे २०००)
१९१९: ग. दि. माडगूळकर - गीतकार, कवी, लेखक आणि अभिनेते (निधन: १४ डिसेंबर १९७७)
१९०६: सचिन देव बर्मन - भारतीय संगीतकार व गायक - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: ३१ ऑक्टोबर १९७५)
१९०४: ए. के. गोपालन - भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी (निधन: २२ मार्च १९७७)
१८४२: एस. सुब्रमणिया अय्यर - भारतीय वकील आणि न्यायशास्त्रज्ञ (निधन: ५ डिसेंबर १९२४)
आज यांची पुण्यतिथी
२०२२: कोडियेरी बालकृष्णन - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (जन्म: १६ नोव्हेंबर १९५३)
२०२२: तुलसी तंती - भारतीय अक्षय ऊर्जा कार्यकारी, सुझलॉनचे संस्थापक (जन्म: २ फेब्रुवारी १९५८)
१९३१: दिवाकर - नाट्यछटाकार (जन्म: १८ जानेवारी १८८९)