लोकशाही स्पेशल

दिनविशेष 18 सप्टेंबर 2023 : उरी आतंकी हल्ला; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 18 September 2023 : सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 18 सप्टेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१६: उरी आतंकी हल्ला - जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटाने केलेल्या भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील उरी हल्ल्यात भारतीय लष्कराचे १९ जवानांचे निधन.

२०११: सिक्कीम भूकंप - ईशान्य भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि दक्षिण तिबेटमध्ये जाणवला.

२००२: हृषिकेश मुखर्जी - दिग्दर्शक, यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

१९९९: व्यंकटेश माडगूळकर - साहित्यिक, यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.

१९९७: टेड टर्नर - या अमेरिकन उद्योगपतींनी संयुक्त राष्ट्रांना १ अब्ज अमेरिकी डॉलर (तेव्हाचे ११४० करोड रुपये) दान केले.

१९९७: कालिदास संस्कृत विद्यापीठ, महाराष्ट्र - स्थापना.

१९८४: जो किटिंगर - यांनी अटलांटिक महासागर पहिल्यांदाच एकट्याने बलून मधून पार केले.

१९७७: व्हॉयेजर-1 - पृथ्वी आणि चंद्राचे पहिले दूरचे एकत्र छायाचित्र घेतले.

१९४८: मार्गारेट चेस स्मिथ - दुसर्‍या सिनेटचा कार्यकाळ पूर्ण न करता युनायटेड स्टेट्स सिनेटवर निवडून आलेल्या पहिल्या महिला बनल्या.

१९४८: हैद्राबाद मुक्तिसंग्राम - ओपेशन पोलो: भारतीय सैन्याने हैदराबादच्या सैन्याचे आत्मसमर्पण स्वीकारल्यानंतर ऑपरेशन पोलो बंद करण्यात आले.

१९२७: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स - स्थापना.

१९२४: महात्मा गांधी - यांचे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू.

१९२२: लीग ऑफ नेशन्स - हंगेरी देशाचा लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश.

१९१९: फ्रिट्झ पोलार्ड - हे व्यावसायिक फुटबॉल खेळणारे पहिले आफ्रिकन-अमेरिकन कृष्णवर्णीय व्यक्ती बनले.

१९१९: नेदरलंड - देशामध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला.

१९०६: हाँगकाँग वादळ - या वादळात किमान १० हजार लोकांचे निधन.

आज यांचा जन्म

१९६८: उपेंद्र राव - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि राजकारणी

१९५६: अनंत गाडगीळ - भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार

१९५०: विष्णुवर्धन - भारतीय अभिनेते (निधन: ३० डिसेंबर २००९)

१९१२: राजा नेने - भारतीय अभिनेते व दिग्दर्शक (निधन: २१ फेब्रुवारी १९७५)

१९०६: काका हाथरसी - हिंदी हास्यकवी - पद्मश्री (निधन: १८ सप्टेंबर १९९५)

१९००: शिवसागर रामगुलाम - मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री (निधन: १५ डिसेंबर १९८५)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: रश्मी जयगोपाल - भारतीय अभिनेत्री

२०२२: निशी सिंग - भारतीय अभिनेत्री

२०१३: वेलियाम भरगवन - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार

२००४: डॉ. भालचंद्र दिनकर फडके - दलित साहित्याचे समीक्षक

२००२: शिवाजी सावंत - मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक (जन्म: ३१ ऑगस्ट १९४०)

१९९९: अरुण वासुदेव कर्नाटकी - मराठी चित्रपट दिग्दर्शक

१९९५: काका हाथरसी - हिंदी हास्यकवी - पद्मश्री (जन्म: १८ सप्टेंबर १९०६)

१९९३: असित सेन - विनोदी अभिनेते व दिग्दर्शक

१९९२: मुहम्मद हिदायतुल्लाह - भारताचे ६वे उपराष्ट्रपती, आणि कार्यकारी राष्ट्रपती, ११वे सरन्यायाधीश (जन्म: १७ डिसेंबर १९०५)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mutual Fund : म्युच्युअल फंडातील गडगडाट! ऑगस्टमध्ये गुंतवणुकीत मोठी घट

Latest Marathi News Update live : नगरपालिकेच्या हद्दीत मिळणार घरकुल योजनेचा लाभ ...

Ladki Bahin Yojana : महिला लाभार्थींना दिलासा, ऑगस्ट हप्त्याचा निधी अंतिम टप्प्यात

Crime : पैशासाठी माणुसकीला तिलांजली; जमिनीच्या वादामुळे दोन दिवस मृतदेह अडकला