Dinvishesh 23 December 2023 : सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 23 डिसेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२०१३: सलमान खान विरुद्ध १७ साक्षीदारांनी साक्ष नोदवल्यानंतर सत्र न्यायालयाने सलमान खान विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत, खटला सत्र न्यायालयात वर्ग केला.
२००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.
२०००: कलकत्ता शहराचे नाव कोलकता असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी
१९७०: धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित नटसम्राट या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.
१९५४: डॉ. जे. हार्टवेल हॅरिसन आणि डॉ. जोसेफ इ. मरे यांनी जिवंत व्यक्तिमधील मूत्रपिंड काढुन पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली.
१९४७: अमेरिकेतील बेल रिसर्च लॅब्ज या संशोधन संस्थेने ट्रॅन्झिस्टर या उपकरणाचा शोध लावल्याची घोषणा केली.
१९४०: वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे हिन्दुस्थान एअरक्राफ्ट हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
१८९३: हॅन्सेल ऍॅंड ग्रेटेल या प्रसिद्ध सांगितिक परिकथेचा पहिला प्रयोग झाला.
आज यांचा जन्म
१९४२: अरुण बाली - भारतीय अभिनेते (निधन: ७ ऑक्टोबर २०२२)
१९०२: चौधरी चरण सिंग - भारताचे ५वे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक (निधन: २९ मे १९८७)
१८९७: कविचंद्र कालिचरण पटनाईक - ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार
१६९०: पामेबा - मणिपूर साम्राज्याचे सम्राट
आज यांची पुण्यतिथी
२०१४: के. बालाचंदर - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक (जन्म: ९ जुलै १९३०)
२०१३: जी. एस. शिवारुद्रप्पा - भारतीय कवी आणि शिक्षक (जन्म: ७ फेब्रुवारी १९२६)
२०१३: मिखाईल कलाशनिको - एके ४७ बंदुकीचे निर्माते (जन्म: १० नोव्हेंबर १९१९)
२०१२: आनंद अभ्यंकर - अभिनेते (जन्म: २ जून १९६३)
२०१०: ज्ञानेश्वर नाडकर्णी - कला समीक्षक व लेखक (जन्म: २१ मे १९२८)
२०१०: के. करुणाकरन - केरळचे ५वे मुख्यमंत्री (जन्म: ५ जुलै १९१८)
२००८: गंगाधर महांबरे - गीतकार, कवी व लेखक (जन्म: ३१ जानेवारी १९३१)
२००४: पी. व्ही. नरसिम्हा राव - भारताचे ९वे पंतप्रधान (जन्म: २८ जून १९२१)
१९९८: आप्पा कुंभार - स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील नेते (जन्म: १५ सप्टेंबर १९०९)
१९७९: दत्ता कोरगावकर - हिंदी व मराठी चित्रपट संगीतकार
१९६५: गणपतराव बोडस - श्रेष्ठ गायक आणि नट (जन्म: २ जुलै १८८०)
१९२६: स्वामी श्रद्धानंद - भारतीय गुरु, गुरुकुल कांग्री विश्वविद्यालयाचे संस्थापक (जन्म: २ फेब्रुवारी १८५६)