लोकशाही स्पेशल

दिनविशेष 23 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 23 September 2023 : सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 23 सप्टेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन

२०१९: थॉमस कूक ग्रुप कंपनी - या प्रसिद्ध कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. किमान ६ लाख प्रवाशी ग्राहक जगभरात अडकले.

२००४: जीन चक्रीवादळा, हैती - वादळामुळे किमान ३ हजार लोकांचे निधन.

२००२: मोझिला फायरफॉक्स - ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.

१९३२: सौदी अरेबिया - हेझाझ आणि नेजडचे राज्य मिळून एकत्रीकरण पूर्ण झाले.

१९०८: युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा, कॅनडा - स्थापना झाली.

१९०५: कार्लस्टॅड करार - नॉर्वे आणि स्वीडन यांच्यात शांतता करार.

१८८९: निन्टेन्डो कंपनी लिमिटेड - स्थापना.

१८८४: बाँबे मिल हँड्स असोसिएशन - गिरणी कामगार संघटनेची स्थापना.

१८४६: नेपच्यून ग्रह - अर्बेन ली व्हेरिअर यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.

१८०३: दुसरे इंग्रज-मराठा युद्ध - अश्तेची लढाई: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यात लढाई.

१६४१: मर्चंट रॉयल जहाज - १,००,००० पौंड सोन्याचा खजिना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले.

आज यांचा जन्म

२०००: श्रेया अग्रवाल - भारतीय रायफल नेमबाज - सुवर्ण पदक

१९५७: कुमार सानू - पार्श्वगायक

१९५२: अंशुमान गायकवाड - भारतीय क्रिकेटपटू

१९५१: पी. आर. क्रिष्णा कुमार - भारतीय आयुर्वेदिक चिकित्सक, एव्हीपी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक (निधन: १६ सप्टेंबर २०२०)

१९५०: डॉ. अभय बंग - समाजशास्त्रज्ञ

१९४३: तनुजा - अभिनेत्री

१९३५: प्रेम चोप्रा - भारतीय अभिनेते

१९२०: भालबा केळकर - नाट्य लेखक व अभिनेते (निधन: ६ नोव्हेंबर १९८७)

१९१९: देवदत्त दाभोळकर - पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ (निधन: १७ डिसेंबर २०१०)

१९१७: आसिमा चॅटर्जी - भारतीय रसायनशास्त्र - पद्म भूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (निधन: २२ नोव्हेंबर २००६)

१९११: राप्पल संगमेश्वर कृष्णन - भारतीय भौतिकशास्त्रज्ञ

१९०८: रामधारी सिंह दिनकर - देशभक्त व हिंदी साहित्यिक - पद्म भूषण, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: २४ एप्रिल १९७४)

१९०३: युसूफ मेहेर अली - समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक (निधन: २ जुलै १९५०)

१८८१: होमी मोदी - उद्योगपती आणि प्रशासक (निधन: ९ मार्च १९६९)

आज यांची पुण्यतिथी

२०२०: भूपेश पांड्या - भारतीय चित्रपट अभिनेते (जन्म: २० जानेवारी १९७२)

२०१५: स्वामी दयानंद सरस्वती - भारतीय भिक्षू आणि तत्त्वज्ञ (जन्म: १५ ऑगस्ट १९३०)

२०१२: के. लाल - जादूगार

२००४: डॉ. राजा रामण्णा - शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष (जन्म: २८ जानेवारी १९२५)

१९९९: गिरीश घाणेकर - मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते

१९६४: मामा वरेरकर - नाटककार (जन्म: २७ एप्रिल १८८३)

१८५८: ग्रँट डफ - मराठ्यांचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश अधिकारी (जन्म: ८ जुलै १७८९)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Indian Woman Arrest USA : अमेरिकेत भारतीय महिलेला चोरीच्या आरोपाखाली अटक; पोलिसांच्या प्रश्नावर सोशल मीडियावर संताप

Ambadas Danve : "मी पुन्हा येईन...", विधान परिषदेतील अंबादास दानवेंचे निरोप भाषण चर्चेत

Indians Executed Abroad : 'या' देशात भारतीयांना सर्वाधिक फाशी ; निमिषा प्रिया प्रकरणानंतर आकडेवारी समोर

Israel Attack On Syria : सिरियातील लष्करी मुख्यालयावर इस्रायलचा हल्ला; तणाव वाढला