Dinvishesh 27 November 2023 :सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 27 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२०१६: निको रोसबर्ग २०१६ फोर्मुला १ चा चाम्पियान बनला.
१९९५: गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
१९४४: दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन ७० जण ठार झाले.
१८३९: बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन ची स्थापना.
१८१५: पोलंड राज्याच्या संविधान स्वीकारले गेले.
आज यांचा जन्म
१९८६: सुरेश रैना - भारतीय क्रिकेटपटू
१९५२: बॅप्पी लाहिरी - भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते
१९४०: ब्रूस ली - अमेरिकन अभिनेते आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ (निधन: २० जुलै १९७३)
१९१५: दिगंबर मोकाशी - मराठी कथा कादंबरीकार (निधन: २९ जून १९८१)
१९०९: अनातोली माल्त्सेव - रशियन गणितज्ञ
१९०७: हरिवंशराय बच्चन - भारतीय हिंदी साहित्यिक आणि कवी - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: १८ जानेवारी २००३)
१९०३: लार्स ऑन्सेगर - नॉर्वेचे रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार
१९०३: लार्स ओन्सागेर - नॉर्वेजियन-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: ५ ऑक्टोबर १९७६)
१८९४: कोनसुके मात्सुशिता - पॅनासोनिकचे संस्थापक (निधन: २७ एप्रिल १९८९)
१८८८: गणेश वासुदेव मावळंकर - भारतीय लोकसभेचे पहिले सभापती
१८८१: डॉ. काशीप्रसाद जायस्वाल - प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ (निधन: ४ ऑगस्ट १९३७)
१८७८: जतिंद्रमोहन बागची - भारतीय कवि आणि समीक्षक (निधन: १ फेब्रुवारी १९४८)
१८७४: चेम वाइझमॅन - इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष (निधन: ९ नोव्हेंबर १९५२)
१८७१: जियोव्हानी जॉर्जी - इटालियन भौतिकशास्रज्ञ
१८७०: द. ब. पारसनीस - इतिहास संशोधक
१८५७: सर चार्ल्स शेरिंग्टन - ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: ४ मार्च १९५२)
१७०१: अँडर्स सेल्सियस - स्वीडिश खगोलशास्त्र आणि संशोधक
आज यांची पुण्यतिथी
२०१६: इओनिस ग्रीवास - ग्रीस देशाचे १७६वे पंतप्रधान (जन्म: २३ फेब्रुवारी १९२३)
२००८: व्ही. पी. सिंग - भारताचे ७वे पंतप्रधान (जन्म: २५ जून १९३१)
२००७: रॉबर्ट केड - गेटोरेडचे सहनिर्माते (जन्म: २६ सप्टेंबर १९२७)
२००२: शिवमंगल सिंग सुमन - भारतीय कवी आणि शैक्षणिक (जन्म: ५ ऑगस्ट १९१५)
२०००: बाळकृष्ण सातोस्कर - साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक (जन्म: २६ मार्च १९०९)
१९९५: संजय जोग - दूरदर्शन व चित्रपट कलावंत
१९९४: नानासाहेब पुरोहित - स्वातंत्र्यसेनानी, रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक (जन्म: २८ मे १९०७)
१९७८: लक्ष्मीबाई केळकर - राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका (जन्म: ६ जुलै १९०५)
१९७६: गजानन त्र्यंबक माडखोलकर - प्रसिद्ध मराठी पत्रकार. समीक्षक आणि कादंबरीकार (जन्म: २८ डिसेंबर १८९९)
१९६७: लेओन मब्बा - गॅबॉन देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: ९ फेब्रुवारी १९०२)
१९५२: अहिताग्नी राजवाडे - वैदिक धर्माचे पुरस्कर्ते (जन्म: २३ ऑक्टोबर १८७९)
१७५४: अब्राहम डी. मुआव्हर - फ्रेन्च गणिती (जन्म: २६ मे १६६७)