Dinvishesh 28 September 2023 : सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 28 सप्टेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
अनंत चतुर्दशी
ईद-ए-मिलाद
आंतराष्ट्रीय माहिती जाणण्याचा दिन
२०१८: सुलावेसी भूकंप २०१८ - या ७.५ रिश्टर भूकंपामुळे निर्माण झालेल्या मोठ्या त्सुनामी दुर्घटने मध्ये किमान ४३४० लोकांचे निधन तर १० हजार पेक्षा जास्त लोक जखमी.
२००८: फाल्कन १ - स्पेसएक्स कंपनी चे पहिले खाजगी अंतराळयान प्रक्षेपित.
१९९९: आशा भोसले - यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
१९९४: एमएस एस्टोनिया क्रूझ - हे जहाज बाल्टिक समुद्रात बुडाले त्यात किमान ८५२ लोकांचे निधन.
१९५१: पहिले रंगीत टेलिव्हिजन - CBS ने पहिले रंगीत टेलिव्हिजन सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध केले,
१९२८: पेनिसिलिन - सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ होताना आढळली. यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला.
१९२४: पहिली पृथ्वी प्रदक्षिणा - पहिली पृथ्वी प्रदक्षिणा विमान फेरी अमेरिकन सैन्याने पूर्ण केली.
१९१२: फ्रँक एस. स्कॉट - हे विमान अपघातात मरण पावलेले पहिले युनायटेड स्टेट्स आर्मीचे कॉर्पोरल भरती झालेले व्यक्ती आहे.
आज यांचा जन्म
१९८२: अभिनव बिंद्रा - ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय - पद्म भूषण, मेजर ध्यान चंद खेलरत्न
१९८२: रणबीर कपूर - चित्रपट अभिनेते
१९६६: पुरी जगन्नाध - भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक
१९४०: नारायण - भारतीय कादंबरीकार, केरळचे पहिले आदिवासी कादंबरीकार (निधन: १६ ऑगस्ट २०२२)
१९२९: लता मंगेशकर - भारतीय जगप्रसिद्ध पार्श्वगायिका - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: ६ फेब्रुवारी २०२२)
१९२४: सुन्द्री उत्तमचंदानी - भारतीय लेखक (निधन: ८ जुलै २०१३)
१९०९: पी. जयराज - भारतीय अभिनेते - दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: ११ ऑगस्ट २०००)
१९०७: भगत सिंग - क्रांतिकारक (निधन: २३ मार्च १९३१)
१८९८: मामाराव दाते - स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार शंकर रामचंद्र तथा
आज यांची पुण्यतिथी
२०२२: जयंती पटनायक - राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा (जन्म: ४ एप्रिल १९३२)
२०२०: गुरुराजा श्यामाचार्य अमूर - भारतीय साहित्यिक समीक्षक आणि लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ८ मे १९२५)
२०१२: ब्रजेश मिश्रा - भारताचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार - पद्म विभूषण (जन्म: २९ सप्टेंबर १९२८)
२००४: डॉ. मुल्कराज आनंद - लेखक (जन्म: १२ डिसेंबर १९०५)
१९९४: के.ए. थांगावेलू - भारतीय चित्रपट अभिनेते आणि विनोदकार (जन्म: १५ जानेवारी १९१७)