लोकशाही स्पेशल

दिनविशेष 7 डिसेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 7 December 2023 : सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 7 डिसेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन

भारतीय लष्कर ध्वज दिन

२०१६: पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्सचे पीके ६६१ विमान कोसळले. यात ४७ लोकांचा मृत्यू.

१९९८: ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड.

१९९५: फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन इन्सॅट-२सी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.

१९९४: कन्नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर.

१९८८: यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.

१९७५: इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.

१९४१: दुसरे महायुद्ध जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.

१९१७: पहिले महायुद्ध अमेरिकेने ऑस्ट्रिया हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.

१८५६: पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात झाला.

१८२५: बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे भारतात आलेले पहिले जहाज.

आज यांचा जन्म

१९५७: ऑफ लॉसन - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूजि

१९२१: स्वामी महाराज - भारतीय हिंदू नेतेप्रमुख (निधन: १३ ऑगस्ट २०१६)

१९०२: जे. जी. नवले - कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक (निधन: ७ सप्टेंबर १९७९)

आज यांची पुण्यतिथी

२०२०: चक येगर - ध्वनीपेक्षा जास्त वेगाने पहिले यशस्वी उड्डाण करणारे वैमानिक (जन्म: १३ फेब्रुवारी १९२३)

२०१३: विनय आपटे - ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक

२००१: सुब्रतो मित्रा - प्रसिद्ध कॅमेरामन

१९९७: स्वामी शांतानंद सरस्वती - ज्योतिर्मठाचे शंकराचार्य (जन्म: १६ जुलै १९१३)

१९८२: बाबूराव विजापुरे - संगीतशिक्षक (जन्म: १७ जून १९०३)

१९७६: गोवर्धनदास पारेख - विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ

१९४१: भास्कर तांबे - कवी (जन्म: २७ ऑक्टोबर १८७४)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज चौदावी सुनावणी

Pune Bhide Bridge : पुण्यातील भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

iPhone 17 : Apple ने नव्या फीचर्ससह लाँच केला आयफोन 17

Accident : अटल सेतूवर भीषण अपघात; एका व्यक्तीचा जागीच मृत्यू