लोकशाही स्पेशल

दिनविशेष 9 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 9 November 2023 : सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 9 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

कायदाविषयक सेवा दिन

२०००: उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना.

१९९७: साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान चा जनस्थान पुरस्कार प्रदान.

१९८८: मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.

१९६७: रोलिंग स्टोन मासिकांचा पहिला अंक प्रकाशित झाला.

१९६५: इलेक्ट्रिसिटी ग्रिड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बऱ्याच भागाचा वीजपुरवठा १२ तास खंडित झाला.

१९६०: रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष बनले.

१९४७: भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.

१९२३: दिनचर्या नावाचे एक पत्र दतात्रय गणेशजी यांनी पुण्यात सुरु केले.

१९०६: आपल्या कार्यकालात देशाबाहेर जाणारे थिओडोर रुझव्हेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी पनामा कालव्याला भेट दिली.

आज यांचा जन्म

१९८४: एल्युड किपचोगे - केनियन धावपटू, १:५९:४० या वेळेसह दोन तासांपेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन धावणारे पहिले व्यक्ती

१९८०: पायल रोहतगी - अभिनेत्री व मॉडेल

१९४४: चितेश दास - भारतीय कोरिओग्राफर (निधन: ४ जानेवारी २०१५)

१९३१: लक्ष्मी मल सिंघवी - भारतीय कायदेपंडित, विद्वान आणि मुत्सद्दी - पद्म भूषण (निधन: ६ ऑक्टोबर २००७)

१९०४: पंचानन माहेश्वरी - सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ (निधन: १८ मे १९६६)

१८७७: सर मोहम्मद इक़्बाल - सारे जहाँ से अच्छा गीताचे कवी आणि राजकारणी (निधन: २१ एप्रिल १९३८)

१८६७: श्रीमद राजचंद्र - जैन तत्त्वज्ञानी, विद्वान, कवी (निधन: ९ एप्रिल १९०१)

आज यांची पुण्यतिथी

२०११: हर गोबिंद खुराना - भारतीय-अमेरिकन जैव रसायनशास्त्रज्ञ - पद्म विभूषण, नोबेल पुरस्कार (जन्म: ९ जानेवारी १९२२)

२००५: के. आर. नारायणन - भारताचे १०वे राष्ट्रपती (जन्म: २७ ऑक्टोबर १९२०)

२००३: विनोद बिहारी वर्मा - मैथिली भाषेतील लेखक व कवी

१९७७: केशवराव भोळे - गायक, अभिनेते, संगीत समीक्षक आणि दिग्दर्शक (जन्म: २३ मे १८९६)

१९६२: धोंडो केशव कर्वे - भारतीय प्राध्यापक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते - भारतरत्न, पद्म विभूषण (जन्म: १८ एप्रिल १८५८)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gaza Situation : अन्न-पाण्यासाठी झुंजताना शेकडो पॅलेस्टिनी नागरिकांचे बळी

Google Online Courses : गुगलच्या 'या' मोफत कोर्सेसमुळे करिअरमध्ये प्रगतीची संधी

Rohit Pawar On ED Action : '...आणि म्हणून माझ्या एकट्यावर EDची कारवाई केली' रोहित पवारांनी सगळंच सांगितलं

Sambhajiraje Chhatrapati : 'युनेस्को गडकिल्ल्यांचे ब्रँडींग करेल, जतन आपल्याला करायचंय'; छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया